
सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: राज्यशासनाच्या वतीने शनिवार व रविवार रोजी वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.त्या अनुषंगाने शनिवार रोजी भराडी येथील आठवडी बाजार असुनही आत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.शनिवार व रविवार रोजी कडकडीत लाॅकडाऊन असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.तसेच भराडी ग्रामपंचायतच्या वतीने बाजारपेठेतील सर्व व्यावसायिकांनी शनिवार व रविवार रोजी आपापली दुकाने बंद ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
लाॅकडाऊन दरम्यान सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पंडीत इंगळे,पोलीस उपनिरिक्षक विकास आडे,आमठाणा बिट जमादार विठ्ठल चव्हाण,पोलीस नाईक संदीप कोथलकर आदी पोलीस कर्मचारी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर होते.
