मनमाड़ रेल्वे कामगारांसाठी लसीकरण केंद्र उपलब्ध होणार

0

मनमाड: नाशिक जिल्हा प्रशासन ,भुसावळ मंडळ व मुख कारखाना प्रबंधक यांच्या प्रयत्नातून मनमाड रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यासाठी रेल्वे स्टेशन जवळ नवीन लसीकरण केंद्र उपलब्ध होणार आहे. याकामी नाशिक सी ई ओ लीना बनसोड मॅडम,मुख्य कारखाना प्रबंधक मनमाड़ मो.फैज, नाशिक जिल्हा ग्रामीण उपरुग्णालय मनमाड चे अधिक्षक,डॉ नरवणे, रेल्वे दवाखाना चे सहाय्यक चिकित्साधिकारी डॉ क्षत्रिय यांनी लसिकरण केंद्र इमारतीची पाहणी केली, काही बाबीची पुर्तता झाल्यानंतर त्वरीत लसिकरण केन्द्रास मान्यता देऊन लसिकरण सुरु केले जाईल अशी माहिती सीईओ नाशिक यांनी दिली आहे, या लसिकरण केंद्रामुळे रेल्वे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचा परिवार यांना लाभ घेता येणार आहे. याप्रसंगी मनमाड़ मुख्याधिकारी मुंडे , नगरसेवक गणेश धात्रक,एससी/एसटी असो मध्य रेल्वेचे झोनल सचिव सतीश केदारे, सिद्धार्थ जोगदंड उपस्थित होते. याबाबत एससी/एसटी असोशियशन ने रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी व केली होती.तसेच दि.२४/३/२१ रोजी मा.जिल्हाधिकरी साहेब सुरज मांढरे मनमाड दौऱ्यावर आले आसता त्या निवेदनाद्वारे ही मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here