गोलेगाव ते आनवा रसत्याची दुर्दशा

0

सिल्लोड(बातमीदार) विनोद हिंगमिरे: पानबडोद मार्गे गोलेगाव ता आनवा 10 कि.मी च्या मुख्य रसता खराब झाल्याने वाहनधारक व प्रवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत.गेल्या अनेक दिवसापासुन रसत्यावरील डांबर व खडी उखडल्यामुळे जागो जागी मोठ मोठे खड्डे निर्णाण झाले आहेत अशा रसत्यातुन वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत तसेच प्रवाश्यांना अत्यंत त्रासदायक प्रवास करावा लागत आहेत.ऐतीहासीक गाव व मंदीराची नगरी अशी ओळख असलेल्या या गावात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, आजुबाईचे मंदीर,ऐतीहासीक मठ व भव्य अरबी मदरसा सारख्या वस्तु असल्याने येथे राज्यभरातील भावीक इतिहासप्रेमी व विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते परंतु या सर्वांना खराब झालेल्या याच मुख्य रसत्यावरुन त्रासदायक प्रवास करुन गावात यावा लागत आहेत.मागील अनेक दिवसापासुन रसत्याची दुर्दशा झालेली आहेत परंतु संबंधीत विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही तसेच लोकप्रतीनिधी झोपेचे सोंग घेत आहेत या विषयाकडे जबाबदार व्यक्ती व संबंधीत विभागाने गांभिर्याने लक्ष देऊन जनहितार्थ काम करावं,
(शेख खलील अहेमद–नागरीक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here