सिल्लोड शहरातील शिवाजीनगर भागातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड शहरातील शिवाजीनगर भागातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचत असल्याने शिवाजीनगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,शिवाजी नगर समता नगर या भागातील स्वच्छता करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने मर्जीतील खाजगी ठेकेदार निमुन दिला असल्याने सदरील केदार हा मागील बऱ्याच दिवसांपासून मनमानी करीत असून या भागातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्या जात आहे शिवाजीनगर समतानगर भागातील मुख्य रस्त्यांवर संडास चे पाणी दिवसभर वाहत असल्याने नागरिकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागते अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत तर या भागातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाम असल्यामुळे या नाल्यांमधून सांडपाणी वाहत नाही परिणामी ते पाणी नाल्यांमध्ये साचून सांडपाण्याच्या पाइपमधून नागरिकांच्या घरात जात आहे याबाबत अनेक वेळा संबंधित ठेकेदाराकडे तक्रारी करून देखील याकडे जाणून दुर्लक्ष केल्या जात असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांकडून केल्या जात आहेत शिवाजी नगर समता नगर या भागाचे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाकडून या भागाच्या स्वच्छते बाबत दुजाभाव केल्या जात असल्याचे सदरील नगरसेवकांचे म्हणणे आहे नगरपरिषद प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन शिवाजीनगर समतानगर भागातील स्वच्छता मोहीम तात्काळ हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने जोर धरीत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here