शरद पवार साहेबांवर विकृत दर्जाच्या पोस्ट करणाऱ्यांचा तीव्र निषेध

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: देवळा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत असलेल्या विकृत व्यक्तींविरोधात सायबर क्राईम खाली गुन्हे दाखल करण्यात यावे या आशयाचे निवेदन दि. ७ एप्रिल रोजी देवळा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांना देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची तब्येत खालावल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह समाजातील इतरही अनेक घटक त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा देत, मनोकामना करीत होते त्याच वेळी भाजपा व त्यांची विचारधारा असलेले काही विकृत कार्यकर्ते पवार साहेबांवर हिन व आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करत होते आपले मत मांडण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असले तरी सामाजिक ऐक्य, संस्कृती याला हानी पोहोचेल असे व वैयक्तिक अशा खालच्या दर्जाच्या टीका ही विकृत मंडळी करत होती मर्यादा सोडून खालच्या दर्जाच्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर सायबर क्राईम खाली गुन्हे दाखल करण्यात यावे व अशा समाजविघातक प्रवृत्तींचा आम्ही राष्ट्रवादी युवक कांग्रेस तीव्र निषेध करतो अशा आशयाचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस सुशांत गुंजाळ, उपाध्यक्ष धनंजय बोरसे, चिटणीस शाहरुख पटेल, सोशल मीडिया अध्यक्ष सनी आहेर, संपर्कप्रमुख किशोर खरोटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here