पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पडल्या कोरड्या ठाक

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: देवळा तालुक्यातील जनता तसेच पशुधनाला लागली पुनदच्या पाण्याची तहान! पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पडल्या कोरड्या ठाक;गिरणा नदीला तात्काळ आर्वतन सोडण्याची मागणी,देवळा तालुक्यातील गिरणा नदी काठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या व शेतीवापर असलेल्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्याची टंचाई भासत असून पुनद धरणातून गिरणा नदीला तात्काळ आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातून होत आहे.देवळा तालुक्यातील गिरणानदी काठावरील खामखेडा,भऊर,सावकी,विठेवाडी, लोहणेर,वासुळ महालपाटणे, निंबोळा व परिसरातील जनतेसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे त्यामुळे गिरणा नदी काठावरील गावांमध्ये सुद्धा पिण्याचा पाण्याचा व कांदा पिकाला शेवटच्या दोन पाण्याची गरज असताना पाणी प्रश्न जटिल होत चालला आहे.नदीकाठावरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरडया ठाक पडल्या असून गिरणा नदीला पाणी सोडल्यास नदी काठावरील गावांना फायदा होईल.व सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या व शेतकऱ्यांच्या विहीरींसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे प्रशासनाने गिरणा नदीला निंबोळा गावांपर्यंत पाणी येईल अशा पद्धतीने आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.कळवण-सुरगाणाचे आमदार नितिन पवार यांनी २६ मार्च रोजी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पाठपुरावा करून अर्जुन सागर धरणातून कळवण तालुक्यातील खेडेगाव,विसापूर,ककाणे,मोकभणगी,काठेदिगर,रवळजी,सुळे,सुपलेदिगर,नाळीद, देसराणे,जयदर,पिंपळे,गणोरे, निमपाडा,धांडेदिगर,भांडणे तसेच नदी परिसरातील इतर गावातील ग्रामस्थांनी पाण्याच्या आवर्तनाची मागणी केली होती त्या अनुषंगाने आवर्तन सोडण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून हे आवर्तन आठवडाभर पुरेशा क्षमतेने सोडल्यास देवळा तालुक्यातील गावांची देखील पाणी टंचाई दूर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here