उत्तम तेटांबे यांना हिंदुस्थान पेट्रोलियम तर्फे एच पी गौरव पुरस्कार प्रदान..

0

मुंबई – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्तम तेटांबे यांना नुकताच हिंदुस्थान पेट्रोलियम यां नामांकित कंपनीचा एच पी गौरव हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी अभिषेक दत्ता – (executive director), के. एस. शेट्टी – (CGM), नीलेश खुलबे – (CGM). गुरुनाथ कुडतरकर – (DGM), सुनील सनस – (GM), मायकेल खंडागळे – (chief manager), श्रीनिवास नंदुरी – (senior manager), सौ. वृषाली उत्तम तेटांबे आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तम तेटांबे हे गेली ३२ वर्षे हिंदुस्थान पेट्रोलियम या नामांकित शासकीय कंपनीत कार्यरत असून. कामावरील त्यांची निष्ठा त्याचबरोबर त्यांच्या प्रामाणिक आणि दैदिप्यमान कार्याची योग्य ती दाखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्राचा वारसा जपत तेटांबे हे श्री कोष्टी समाज सहकारी पतपेढी सारख्या पतसंस्थेत चिटणीस म्हणून देखिल आपली कार्य तत्परता बजावत आहेत. शिवाय अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग असतो.धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे ,सिने -नाट्य दिग्दर्शक, पत्रकार)
९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here