औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शहरात आज पासून दोन दिवसाचा कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे . यात पोलिस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे . की कोणीही विनाकाम रस्त्यावर फिरू नये नसता दंडात्मक कारवाई करण्यात येईल .औरंगाबाद कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट बनत आहे . की काय? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कारोना रुग्णांचा आकडा ९०० च्या पुढे निघाला त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे होत कोरोणा रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी रात्रीची संचारबंदी काही दिवसांपूर्वी लावण्यात आली आहे . त्याचा हवा तेवढा फायदा होताना दिसत नसल्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत औरंगाबाद मध्ये आज पासून दोन दिवसाचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू
वघळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे . विनाकाम रस्त्यावर फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे . शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे .(औरंगाबाद प्रतिनिधी : विनोद हिंगमिरे )