राष्ट्रवादी युवक काँग्रेस देवळा तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: देवळा- राष्ट्रवादी युवक कांग्रेस देवळा तालुका कार्यकारिणी वरील पदाधिकारी यांची बैठक दिनांक 12 मार्च रोजी देवळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील(गोटूआबा) आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समता परिषदेचे नेते रमेश अण्णा अहिरे यांची लोहनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्तम पक्षकार्य व सामान्य जनतेच्या समस्यांची उकल केल्याबद्दल मुन्नापवार, वाखारी व मुन्नाजाधव, खर्डे यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. तालुका पदाधिकारी यांना गावनिहाय जबाबदारी देऊन प्रत्येक गावात नव्याने शाखा उघडण्याच्या सूचना तालुका अध्यक्ष सुनील आहेर यांनी उपस्थित पदाधिकारी यांना दिल्या. बैठकीस रमेश अण्णा अहिरे, दीपक देशमुख, स्वप्नील पाटील, सुशांत गुंजाळ, विलास पवार, धनंजय बोरसे, गोरख अहिरे, प्रवीण खैरनार, गोरख गोसावी, संदीप पवार, सचिन देवरे, ऋषिकेश देवरे, शाहरुख पटेल, प्रवीण निकम, दिनकर आहेर, विजय हिरे, आदित्य शेवाळे, मनोज देशमुख, मनोज गुजरे, मुन्ना जाधव, मुन्ना पवार, पंकज शेवाळे, तेजस निकम, प्रकाश देशमुख, दिनेश अहिरे, किशोर खरोटे, सोशल मीडिया तालुकाअध्यक्ष सनी आहेर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here