‘स्त्री’ ने ठरवलं तर ‘ती’ काहीही करू शकते ! सुराज साधना सुरेश कुटे

0

मुंबई – हो निश्चितच जग बदलते आहे. पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करत, स्त्री ही आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. 8 मार्च ‘जागतिक महिला दिन’ निमित्त कर्तृत्वशील स्त्री शक्तीला अभिवादन. इतिहास साक्षी आहे ! आजच्या काळासोबतच पूर्व कालीन जगात अनेक स्त्री विरांगणांनी प्रेरणादायक कर्तृत्व आणि नेतृत्व केलं आहे. रावणाच्या बंदिस्तते मध्ये राहणाऱ्या सीतेने दिलेली अग्नी परीक्षा, घोर संकटकाळात छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्वाभिमानासाठी तलवार उचलून लढणाऱ्या राणी मनकर्णिका, स्त्री शिक्षणाचा वसा उचलणाऱ्या सावित्रीबाई फुले, एवरेस्ट शिखर गाठणाऱ्या जुनको ताबेई, संशोधनासाठी पृथ्वीपासून लाखो मैल दूर अंतरिक्षात जाणाऱ्या वॅलेंटिना तेरेश्कोव्हा, कमी वयात सुद्धा जिद्दी आणि चिकाटीने डॉक्टरकी पदवी मिळवणाऱ्या आनंदीबाई जोशी, अशा अनेक स्त्रिया जगासमोर ‘ स्त्रीशक्तीचं ‘ उच्चकोटीचं उदहारण बनून अजरामर झाल्या आहेत. स्त्री ची नैसर्गिक नाजूक शारिक रचना, मनातील भावुकता, हळवेपणा, समाजाकडून होणारी हेळसांड, त्यांना दाखवल्या जाणारं दुय्यम स्थान, लाचारी, शोषण, मारहाण, या कटू वास्तवतेचा सामना करत, न डगमगता ताठ मानेने ध्येय बाळगणारी, त्यासाठी झटणारी आणि रक्ताचं पाणी करणारी स्त्री एका अलौकिक निसर्ग शक्तीचं प्रतिकचं म्हणता येईल. आगामी परिस्थितीचं विश्लेषण पाहता, बदलत्या प्रवाहानुसार आचार विचार ही बदलत चालले आहेत. स्त्रियांनी पिंजऱ्यातून निघून मोकळ्या आकाशात जगणं सुरु केलं आहे. त्यांची कारकिर्द वाढत चालली आहे. लिंगभेद संपुष्टात येतांना दिसत आहे. कारण ‘चूल आणि मुल’ क्षेत्रफळ ओलांडून त्यांच्यातील सामर्थ्य जगाला प्रखरपणे झळकावणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढत आहे. “ये हम भी कर सकते है !” असं ठासून म्हणणाऱ्या उर्जायुक्त स्त्रीप्रजातिचा उगम होत आहे. नोकरी, व्यवसाय, शेती, संशोधन, सैन्य, कला, क्रीडा यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये विजयी झेंडा स्त्रिच्या हातून फडकवल्या जात आहे. निथळ पाण्यासारखं चित्र जगाला दिसून येत आहे की, प्रबळ इच्छा शक्ती, अफाट सहनशिलता, उत्तुंग प्रेमवाहक, वीर कथांसोबत प्रेम कथांना अंकुरित करणाऱ्या ‘स्त्री’ ने ठरवलं तर ‘ती’ काहीही करू शकते स्त्री म्हणजे कोण ? स्वतः त्रासात राहून,
तुम्हाला नऊ महिने पोटात बाळगणारी…
आई वडिलांचा त्याग करून,
विवाहानंतर तुमच्या घरी येणारी…
तुम्हाला गरज असतांना,
तुमच्या वर प्रेमाचा आणि स्नेहाचा वर्षाव करणारी…
आयुष्याच्या बिकट काळात,
तुमचा हात धरून तुम्हाला धीर देणारी…
स्वतःच मन राखून,
तुमच्या कुटुंबाचा समतोल राखणारी…
स्वतःच स्वप्न सावटुन,
तुमच्या स्वप्नपूर्ती साठी जगणारी…
प्रपंच नेटका करतांना,
स्वतः पेक्षा जास्त इतरांचा विचार करणारी…
कितीही असेल दुःख,
तरी ते पचवून खळखळून हसणारी…
‘ती’ म्हणजे ‘स्त्री’ !- सुराज साधना सुरेश कुटे
(संपर्क – ७०२१२६४५७८)
(ईमेल – surajkute1@gmail.com)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here