कांदा पीकावर रोगराई शेतकरी चिंताग्रस्त

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: हवामानात सतत होणाऱ्या बदलाचा शेती क्षेत्रावर खूप मोठा प्रभाव होताना दिसून आला आहे .बदलत्या हवामानाशी जुळवून परंपरागत पीक पद्धतीत नाईलाजाने शेतकऱ्यांना बदल करावा लागत आहे अन त्याचाच परिणाम उन्हाळी कांद्यावर बदलत्या हवामानाचा दिसून येत आहे.देवळा तालुक्यात अठरा हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड गत वर्षी झालेली आहे ,तालुक्यातला पूर्व भाग हा हंगामी ओलीतावर विसबलेला असल्यामुळे उन्हाळी कांदा हा तिथल्या शेतकऱ्यांसाठी कायमच नगदी पिकाची भूमिका बजावत आला आहे परंतु या वर्षी हवामानात झालेला बदल आणि त्या अनुषणगाने रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठया प्रमाणात दिसून येत आहे. उन्हाळी कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होऊनही अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना हाती लागेल याची खात्री नाही तालुक्यातील बारमाही शेतीसाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी सततच्या बदलत्या हवामानाचा अनुभव गाठीशी ठेवत काही काळापासून खरीप(लाल) व लेट खरीप या दोन्हीही काद्यांचा मोह सोडत हुकमी रब्बी(उन्हाळी) कांद्याच्या लागवडीला पसंती दिली आहे.सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा पिकांचे शेंडे करपले जात आहेत व कांदा पिवळा पडत आहे ,कर्पापासारक्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
-प्रदिप गोरखसिंग गिरासे शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here