श्री सचिन भाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरात राबविण्यात आला सामाजिक उपक्रम

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातु तथा मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सचिन भाऊ साठे यांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी (दि.२८ रविवार) रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार,तुरे,बॅनर आदी अनपेक्षित खर्च टाळून समाजउपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते.त्यानुषंगाने सिल्लोड तालुक्यातील मानवहीत लोकशाही पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने सिल्लोड शहरातील सुमन हाॅस्पीटल समोर वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांना कार्यकर्त्याच्या वतीने गहु व तांदुळाचे वाटप करण्यात आले.यावेळी कवी धनंजय गव्हाले,सदगुरू येशु सत्संग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील उपक्रम यशस्वी करण्याकरिता मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाकार्याध्यक्ष अशोक कांबळे,तालुका संपर्क प्रमुख सखाराम आहिरे,तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड,तालुका उपाध्यक्ष बाबुराव आहिरे,तालुका युवा अध्यक्ष फकीरचंद तांबे,तालुका सचिव रवी दनके,युवा तालुका सचिव रतन अंभोरे,महीला तालुका अध्यक्ष रामलीला जाधव,तालुका कार्याध्यक्ष विनोद जाधव,तालुका सहसंपर्कप्रमुख एकनाथ शिंदे,सोशल मिडिया तालुका अध्यक्ष संजय कांबळे,नितीन दनके,नितीन सौदागर विनोद जाधव यांच्यासह तालुक्यातील आदी सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here