राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्षाचे बागलान तालुका निरीक्षक सुनील (गोटूआबा) आहेर यांची मोसम प्रतिष्ठान, नामपुर कार्यालयास सदिच्छा भेट

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बागलान तालुका निरीक्षक सुनील गोटूआबा आहेर व नाशिक जिल्हा परिषद सदस्या सौ. नूतन सुनील आहेर यांनी काल दिनांक 27 फेब्रुवारी रोजी नामपुर स्थित मौसम प्रतिष्ठान कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी मौसम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब चिला अहिरे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुनील आहेर म्हणाले की मौसम प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य हे वाखाणण्या जोगे असून कार्य हे सामाजिक असो वा राजकीय त्याला अथक प्रयत्न, कार्यकर्त्यांचे उत्तम संघटन व हेतू प्रामाणिक असेल तर त्यात आपण नक्कीच यशस्वी होतो या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यानेच मी देवळा तालुक्यात 49 गावात 65 युवक शाखेचे उद्घाटन करू शकलो तसेच प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राबविलेल्या अभिप्राय अभियानात देवळा तालुक्याला प्रथम क्रमांक प्राप्त होऊन माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्यांच्या 12 डिसेंबर या वाढदिवशी सत्कार प्राप्त करण्याचे सौभाग्य लाभले, युवकांनी पक्षसंघटनेत प्रामाणिक पणे काम करत राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरद पवार साहेब सामान्य कार्यकर्त्याला ही उचित न्याय देतात. येत्या काही दिवसात कोरोना चे वातावरण बघून शासन नियमांचे पालन करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला सदर मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय रवींद्र नाना पगार व युवक जिल्हा अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम भाऊ कडलग यांचे मार्गदर्शन घेणार असून या मेळाव्यास तुमच्या नामपुर गटाने ही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या सौ नूतन सुनील आहेर यांनी मौसम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे व कार्यकर्त्यांचा सत्कार केला व त्यांच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. यावेळी मोसम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब आहेर, सर्व सदस्य, बारा बलुतेदार संघटनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व चेतन दाणी, तारीक शेख, युवराज दानी, जितू बापू सूर्यवंशी, केदा बापू सोनवणे, सुनील निकुंभ, राजाभाऊ पांचाळ, गणेश खरोटे यांसह जायखेडा पोलीस स्टेशनचे रविराज बच्छाव आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here