केईएम रुग्णालयात महिलांचे रक्तदान शिबिर

0

विजय सूर्यवंशी: मुंबई- हल्लीच युग हे स्त्री-पुरुष खांद्याला खांदा लावून एकत्र चालणारं युग आहे,सावित्रीबाई फुलेनीं स्त्रियांना शिक्षणाचं दालन खुल केलं आणि स्त्रियांनी देखील त्याचा लाभ घेत स्वतःला सिद्ध करत अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे.
पोलीस दल, वैमानिक, शास्त्रज्ञ, सैन्यदल, मर्दानी खेळ अश्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विविध क्षेत्रातही स्त्रिया आता मागे राहिलेल्या नाहीत,अशा ह्या सावित्री’च्या लेकींनी अजून एक नवीन पायंडा पाडायचं ठरवलं आहे.रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या केईएम रुग्णालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी व जीवनदाता ग्रुपने येणारा जागतिक महिला दिनएका अनोख्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे ठरविले आहे.
व त्याचेच औचित्य साधून केईएम रक्तपेढी व जीवनदाता सामाजिक संस्था* यांच्या संयुक्त विद्यमाने घे भरारी रक्तदानासाठी हे फक्त महिलांचे रक्तदान शिबीर
*जागतिक महिला दिन, सोमवार दिनांक ०८ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, रक्तपेढी, केईएम रुग्णालय, परेल, मुंबई. येथे आयोजित करण्यात आले आहे.एक पाऊल पूढे येऊन, न डगमगता सामाजिक उपक्रमात रक्तदान करून, वाघिणीचा ठसा उमटविण्याची संधी यावेळी या महिलांना लाभणार आहे. हिमोग्लोबिन’च्या कमतरतेमुळे महिलांचे प्रमाण रक्तदानात कमी असते, परंतु आता इतर क्षेत्रांप्रमाणे रक्तदानातही या महिलांनी मागे न रहाण्याचा निश्चय केला आहे, नेहमीच महिलांचा उत्साह अगदी खळखळत वाहणाऱ्या झऱ्या सारखा असतो. मग ती स्त्री १८ वर्षाची असो वा ५८ वर्षांची, आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून त्या रक्तदान करताना दिसत असतात. अगदी सेवानिवृत्त महिला सुध्दा आनंदाने रक्तदान करत असतात.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीमती वीणा आमडोसकर, मनस्वी शिवलवकर, विजया जाधव, अंजली धुमाळ, सुजाता आव्हाड, अश्विनी म्हात्रे, जान्हवी नाईक, शिल्पा सकपाळ, सुवर्णा कुळकर्णी, अश्विनी म्हात्रे, आरोही काळे,सिद्धी दळवी, श्रुती थळे, तृप्ती महाडिक,अपर्णा निमकर, जयश्री हांडे, अपर्णा पवार, मिनल कुडाळकर, आरती म्हात्रे इतर अनेक महिलांनी विशेष मेहनत घेत आहेत.कोरोना च्या महामारीत आम्ही सुद्धा न डगमगता रक्तदान करू शकतो. हाच संदेश ह्या निमित्ताने महिलां देणार आहेत.अश्या ह्या उपक्रमात महिलांनी व महिला ग्रुप्सनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती कविता ससाणे, समुपदेशक रक्तपेढी केईएम रुग्णालय. यांचे द्वारे करण्यात आले आहे-  महेश्वर भिकाजी तेटांबे पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here