राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष सुनील (गोटू आबा) आहेर यांचा पांदण रस्ता पाहणी दौरा

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: देवळा तालुक्यातील वाखारी येथील नित्यानंद नगर ते धनदाई माता मंदिर या पांदण रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली असून सदर रस्त्याने पायी चालणे ही मुश्किल आहे पावसाळ्याच्या दिवसात या भागातील जनतेचा गावाशी संपर्कही बंद होतो शालेय विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी घ्यावी लागते, अनेक वेळी घरातील व्यक्ती आजारी पडल्यास दवाखान्यात घेऊन जाणे शक्य होत नसल्याने आजारी व्यक्तीस खाटेवर गावात आणून दवाखान्यात घेऊन जावे लागते अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांच्या मागणी अनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर यांनी स्वतः स्थानिकांसह दोन किलोमीटर पायी जाऊन सदर रस्त्याची पाहणी केली व तात्काळ संबंधितांना रस्ता बनविण्यासाठी आदेश देऊन जनतेस लोकसहभाग व स्वतःच्या मदतीने काम पूर्ण करण्याचे श्‍वासन न देता कामास सुरुवातही केली स्थानिक रहिवाशांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here