ना मास्क ना सोशल डिस्टंसिंग सिल्लोड शहरातले हे चित्र येणाऱ्या काळात धोक्‍याचे ठरू शकते

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात कोरोना च्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असताना सिल्लोड शहरात मात्र कोरोना पासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुठल्याही नियमांचे पालन केल्या जात नसल्याने सिल्लोडला कोरोना चा हॉटस्पॉट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे,वाढत्या कोरोनाला लक्षात घेऊन जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत कोरोना येऊ नये म्हणून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला जात असताना सिल्लोड शहरात मात्र शासकीय यंत्रणा ही उदासीन दिसत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून काही ठिकाणी आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय झालेला असला तरी अशा प्रकारचे सिल्लोड शहरात वा तालुक्यात कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात नसल्याने कोरोना वाढीची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे बस स्थानकावर ही बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना सहज सिल्लोड शहरात प्रवेश असल्यामुळे एखादा लागण झालेला रुग्ण शहरात आल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे याबाबत प्रशासकीय यंत्रणेने कडक पावले उचलण्याची गरज असून कोरोना ला सिल्लोड शहरात येण्यापूर्वीच थोपविणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here