सुभाष नगर येथे व्यायाम शाळेचे भूमिपूजन व रस्ता लोकार्पण संपन्न

0

वासोळ प्रतिनिधी-  प्रशांत गिरासे: देवळा- तालुक्यातील वाखारी गटातील सुभाष नगर येथे वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ नूतन ताई आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी येथील सुभाष नगर ते भावडे फाटा रस्ता सुधारणा करणे याचा लोकार्पण ही त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील गोटूआबा आहेर, पंचायत समिती च्या सभापती श्रीमती शांताबाई पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित युवकांना संबोधित करताना सुनील आहेर म्हणाले की युवकांची अनेक दिवसांपासून ची व्यायाम शाळेच्या मागणीची आज पूर्तता झाली याचा आनंद आहे सद्यस्थितीत युवकांनी शिक्षण व रोजगार याबरोबरच स्वतःच्या आरोग्यावरही लक्ष दिले पाहिजे सुदृढ शरीरासाठी आरोग्य चांगले असणे आवश्यक असल्याने जास्तीत जास्त युवकांनी या व्यायाम शाळेचा लाभ घेतला पाहिजे असे आव्हान करीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्राम विकासासाठी शिक्षित व खंबीर युवकांनी पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले यावेळी विलास पवार गंगाधर पुरकर दशरथ पुरकर नाना मोरे दादाजी माळी प्रभाकर पगार शशी माळी प्रवीण निकम किशोर खैर ओमकार जाधव ईश्वर पगार दिपक निकम कल्पेश बोरसे ठेकेदार सचिन आहेर व ग्राम विस्तार अधिकारी सौ जयश्री निकम हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here