वासोळ गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा वाढीस;प्रशासनाचे दुर्लक्ष

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: येथील गिरणा नदीपात्रातून आणि कोलती नदीपात्रातून अवैध वाळू उपसा दिवसेंदिवस वाढीस लागला आहे मात्र याबाबत प्रशासन अद्यापही झोपेतच आहे.प्रशासन जागे केव्हा होईल असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत.चोर तर चोर वरून शिजोर या प्रमाणे वाळू चोरटे वागू लागले आहेत.भरधाव वेगाने जाणारी वाळूची ट्रॅक्टर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.याबाबत कोणी बोलायला केले तर वाळू चोरटे थेट त्या माणसावर दबंग गिरी दाखवतात. गिरणा व कोलती नदीपात्रातून दररोज सुमारे २०-२५ ट्रॅक्टर वाळू चोरली जाते.असेच जर चालू राहिले तर गावाला एका दिवशी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.एकेकाळी सुजलाम, सुफलाम् असणारा गिराणा परिसर वाळू चोरांमुळे विखुळीस लागेल.गावाचा पाण्याचा प्रश्न हा गिरणा नदीवर अवलंबून असून येणाऱ्या काळात गावाला भीषण पाणीटंचाई ला सामोरे जावे लागेल.बळीराजा देखील या संकटाला मोठ्या प्रमाणात सापडला जाईल.मात्र गावाला देखील घरे बांधायला वाळूचा प्रश्न देखील एक दिवस एनीवर यईल.याबाबत प्रशासन केव्हा खळबळून उठेल यावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here