छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात संपन्न

0

अंबरनाथ प्रतिनिधी ( शैलेश सणस ) छत्रपती शासन प्रतिष्ठान अंबरनाथ महाराष्ट्र आयोजित शिवजन्मोत्सव ३९१ दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात आली.. अंबरनाथ आणि परिसरातील असंख्य तरूण शिवभक्त कोणतंही राजकारण न करता केवळ शिवकार्यासाठी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करीत असतात. यंदा जागतिक महामारी कोरोनाच्या महासंकट काळात शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन करत नियोजित शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येस छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील दामले बाई शाळा येथून शिवजन्मस्थल शिवतीर्थ किल्ले शिवनेरी येथे शिवज्योत प्रज्वलित करून आणण्यासाठी प्रतिष्ठानचे असंख्य मावळे व अंबरनाथ मधील शिवभक्त राष्ट्रभक्त तरुण जे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मिलिट्री/सैन्यभरतीपूर्व सराव करणाऱ्या तरुण शिवभक्तांचे शिवप्रेमींचे कार्यक्रमस्थळ येथून सायंकाळी सात वाजता शिवज्योत प्रज्वलित करण्यासाठी प्रस्तान करण्यात आले आणि मग बदलापूर-मुरबाड-माळशेजघाट-असा वाहनाने प्रवास करून शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे पोहोचताच १९ फेब्रुवारी रात्री बरोबर १२:०० वाजता शिवजन्म स्थळावरून शिव ज्योत प्रज्वलीत करून दौड सुरू करण्यात आली ती थेट किल्ले शिवनेरी गडावरून~गणेश खिंड~माळशेज घाट~ मुरबाड रोड~बारवीडॅम रोड~बदलापूर आणि मग अंबरनाथ मध्ये जांभिवली गावात शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले पुन्हा जांभिवली गावातून पुन्हा शिवज्योत दौंड सुरू झाली ते अंबरनाथ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील मारुती मंदिर मंदिरात येऊन स्वागत करण्यात आले तेथून पुन्हा अंबरनाथ मधील अमर जवान स्मारक हुतात्मा चौक येथे शहीद जवानांना मानवंदना देऊन शिव ज्योत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ येथे विश्ववंद्य शिवछत्रपतींच्या प्रतिमेस मानवंदना देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे कार्यक्रम ठिकाणी शिवज्योतीचे फटाके आतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला आलेले सर्व शिवभक्त शिवप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शिवज्योत पूजन तसेच शिवप्रतिमा पूजन पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला व याच दरम्यान आलेल्या उपस्थित मान्यवरांचे शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले आणि मग शिवपराक्रमाची गाथा शिवव्याख्याते माननीय श्री वाल्मीकराव पाटील जवळकर आळंदी पुणे यांचे सुश्राव्य व्याख्यान व त्यानंतर शिवभक्त समाजसेवक व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर अंबरनाथ मधील कराटे क्लब ११ यांनी स्वसंरक्षणाचे धडे देणारे प्रात्यक्षिक सादरीकरण केलेे व शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके प्रतिष्ठानचे मावळे व बालकलाकारांनी केले त्यानंतर हा शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या सर्व शिवभक्त, शिवप्रेमी,समाजसेवक व विविध राजकीय पक्षातील शिवभक्त यांचे आभार प्रदर्शन करण्यात आले तसेच स्थानिक पत्रकार बांधव प्रसारमाध्यमे डेन ए बी सी न्यूज,महाराष्ट्र रोशनी न्यूज यांचेही आभार व्यक्त करण्यात आले आणि एकूणच सर्व कार्यक्रम कायदा आणि सुव्यवस्था राखत कोरोना महासंकट काळात शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले व यावेळी कर्तव्यावर असलेले उपस्थित पोलिस बांधवांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला या सर्व कार्यक्रमाला आपापल्या परीने शिवकार्य करुन कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे छत्रपती शासन प्रतिष्ठानने आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here