ओम भारत क्रीडा मंडळ तर्फे करोना योद्धांचा सत्कार समारंभ..

0

मुंबई – ओम भारत क्रीडा मंडळ (रजि.) खार (पूर्व) या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत श्री माघी गणेश जयंती निमित्त विभागात कालावधीत आपल्या जीवाची पर्वा न करता अप्रतिम कार्य करणारे पोलिस अधिकारी, डाॅक्टर, नगरसेवक, कार्यकर्ते यांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केले. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी निर्मलनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शशिकांत भंडारे साहेब यांना सन्मानित केले. शिवसेना उपविभाग प्रमुख व माजी नगरसेवक दीपक राजू भुतकर व संस्थेचे माजी अध्यक्ष बबन होळकर यांनी मार्गदर्शन केले. तर मंडळाचे प्रमुख कार्यवाह नंदकुमार परब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे उपाध्यक्ष मोहन वालावलकर यांनी शिवसेना नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा प्रज्ञा दीपक भुतकर यांना सन्मानित केले. ही संस्था गेली ६५ वर्षे विभागात अनेक कला, क्रीडा व ज्ञान उपक्रम राबवित आहे. शिवसेना नगरसेविका प्रज्ञा दीपक भुतकर व उपविभाग प्रमुख श्री. दीपक राजू भुतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभते. सदर प्रसंगी खालील करोना योद्धांना सन्मानित करण्यात आले. पोलिस निरिक्षक चव्हाण, डाॅ. पुजा भुतकर, डाॅ. दिनेश सिंग, डाॅ. संतोष तिवारी, डाॅ. राजेंद्र त्रिपाठी, डाॅ. राजेश विश्वकर्मा, सुनिल मोरे, योगेश घाडी, प्रकाश शिंदे, मनेष नागरेकर, सुनिल सादळे, प्रकाश तावडे, मंगेश परब, अरूण नागरेकर, नितेश साळसकर, भास्कर आसोलकर, सुजित सिंग.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, सभासद व खेळाडू यांनी मोलाचे कार्य केले.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे
पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here