सिडको कॉलनी एरियातील नागरिकांना पाण्याच्या होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण – सौ,लीलाताई गरड नगरसेविका

0

मुंबई – पनवेल महानगरपालिकेची विशेष महासभा दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेली होती, तसेच आज 18 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली आहे. सदरच्या दोन्ही महासभेमध्ये पनवेल महानगरपालिका मध्ये समावेश केलेल्या गावांच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु 80 टक्के लोकसंख्या असलेला सिडको कॉलनी मधील area साठी पनवेल महानगरपालिकेकडून अद्याप पर्यंत एक पैसाही खर्च करण्यात आलेला नाही.महानगरपालिकेच्या काही चौकडीच्या हितासाठी किरकोळ तोंडदेखली कामे केले जातात . त्यामुळे सिडको कॉलनी एरिया मधील रहिवाशांवर गेली चार वर्ष पनवेल महानगरपालिकेकडून सातत्याने दुजाभाव होत असून, सिडको कॉलनी एरियाला सापत्न वागणूक दिली जाते. 8 जानेवारीच्या महासभेत याविरुद्ध आवाज उठवला होता म्हणून बराच हलकल्लोळ माजला होता. आज 18 फेब्रुवारी च्या महासभेत हा विषय जेव्हा जेव्हा मी मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सिडको कॉलनी एरियातील नगरसेवक, सिडको कॉलनी चे प्रश्न सातत्याने मांडत असल्याचा राग येऊन, माझा माइक सातत्याने म्यूट करण्यात येत आहे. एक प्रकारे हा सिडको मधील नागरीकांचा आवाज दाबण्याचा/ दडपण्याचा जोरदार प्रयत्न दिसून येत आहे. तरी सुद्धा मी सिडको कॉलनीची नगरसेविका म्हणून, 80 टक्के लोकसंख्या असलेल्या सिडको कॉलनीच्या विकासासाठी, नागरिकांच्या सोयीसाठी सातत्याने विविध प्लॅटफॉर्मवर आवाज उठवत राहणार आहे.
सिडको कॉलनी एरियातील विकासाची कामे न घेतल्याबद्दल मी आज पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेचा जाहीर निषेध करते.आज सकाळीच एक पुरवणी विषय पत्रिका पाठवण्यात आली. त्यामध्ये 6 गावाचे जलकुंभ व्यवस्था यासाठी करोडो रुपयाचा निधी देऊन महासभेत मंजूर केला . दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सिडको कॉलनी या सिडकोकडून चाळीस वर्षापूर्वी नियोजन केलेले असतानासुद्धा, गेली दहा ते पंधरा वर्ष सिडको कॉलनी येथील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याकडे येथील दहा ते पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांचे व पनवेल महानगर पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांचे मोर्चे कारण नसताना आमच्या घरावर येतायेत, आम्हाला यामध्ये काडीचाही अधिकार नाही . *तरी सिडको कॉलनी एरियातील नागरिकांना पाण्याच्या होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण?* हा माझा प्रश्न आहे. या इकडे महापालिकेचे काही एक लक्ष नाही.
तसेच आपण बारकाईने निरीक्षण केले असता, असे दिसून येते की, कोपरागाव तलावाचे सुशोभिकरण करण्याच्या नावाखाली , तसेच इतर काही कामे मागणी केलेली नसताना सुद्धा, केवळ कंत्राट मधून पैसे मिळवण्यासाठी केली जात असल्याचे, दिसून येत आहे . ज्या सिडको मधील नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत रस्ता-पाणी-गटार- स्ट्रीटलाइट- प्राथमिक आरोग्य या मूलभूत सोयीसुविधा कडे लक्ष न देता केवळ कंत्राटी मधून पैसे मिळवण्याच्या हेतूने कामे मंजूर करण्याकडे कल दिसून येतो.धन्यवाद सौ लीना गरड,,नगरसेविका पनवेल महानगरपालिका,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here