महाराष्ट्र अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालय व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जोशी व सौ.प्रीती जोशी यांच्यावतीने सत्कर्म बालकाश्रमात खाऊ वाटप

0

मुंबई – बदलापुर-सामाजिक कार्याची आवड असणारे व विविध सामाजिक संस्थांनवर कार्यरत असणारे,महाराष्ट्र अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालय व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जोशी व सौ.प्रीती जोशी यांच्या हस्ते सत्कर्म बालकाश्रमातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.प्रदीप जोशी व सौ.प्रीती जोशी यांनी मुलांची आस्थेने चौकशी केली.आश्रमातील कामकाजाची माहीती समजुन घेतली.आश्रमास भेट दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी सत्कर्म बालकाश्रमाचे व्यवस्थापक गेनु कांबळे यांनी स्वागत केले.यावेळी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,सौ.गंधाली तिरपणकर,गणेश ढेबे हे उपस्थित होते. तसेच जनजागृती सेवा समितीही समाजकार्य करत आहे. याची समितीचे सल्लागार प्रदीप जोशी यांनी दखल घेऊन समितीच्या कार्यास सहकार्य म्हणुन प्रदीप जोशी यांनी एक हजार एक रुपये रोख मदत अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांजकडे सुपुर्त केली.त्याकरिता संस्था कार्यकारिणी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे
पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here