
मनमाड – डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२,१३फेब्रुवारी १९३८ रोजी भव्य मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषद घेतली होती. त्या कामगार परिषद च्या वर्धापन दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व बहुजन युवक संघ मनमाड तर्फे अभिवादन कार्यक्रम चे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण, सिनियर इन्स्टिट्युट जवळ, मनमाड येथे करण्यात आले.
यावेळी अर्जुन साळवे यांनी बुद्ध वंदना घेतली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, प्रविणभाऊ आहीरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, वरिष्ठ कार्यकर्ते रविंद्रभाऊ पगारे, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे,जे.एन.वाघ, कारखाना मधील सिनियर सेक्सन इंजिनिअर उत्तम गांगुर्डे, फुले-शाहु-आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे अध्यक्ष मिर्झा बेग, सुरेश अहिरे आदी उपस्थित होते.यावेळी जे.एन.वाघ, शशिकांत अढोरकर,शरद झोंबाड, गणपत कपिल, संतोष शिलावट, पंढरीनाथ पठारे, उत्तम गांगुर्डे,बेग चाचा आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहित भोसले यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले,कार्यालय सचिव संदिप पगारे, बहुजन युवक संघाचे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, हर्षद सुर्यवंशी, किरण वाघ,प्रेमदिप खडताळे, सम्राट गरूड, फकिरा सोनवणे, विनोद खरे, विशाल त्रिभुवन, संतोष सावंत, अनिल मोहन,रोहित कुमार,अवधकिशोर, जयकुमार, राहुल तायडे, राकेश ताठे,सचिन इंगळे, अभ्युदय बागुल, धनेश्वर कुमार, गणपत कपिल, दत्तात्रय शिंदे, प्रशांत मोरे,भलरामसिंग, निखिल सोनवणे, धम्मदिप पखाले,अर्जुन बागुल, वसंत सोनवणे आदी ने केले.
