जिजाऊ ब्रिगेड मुंबई- कोकण विभागीय सभा ठाणे येथे संपन्न. शिवजयंती घरागरात साजरी करण्याबाबत आवाहन. नवीन पद नियुक्त्या आणि वार्षिक कामांचे नियोजन

0

मुंबई – ठाणे, दि. १० फेब्रुवारी २०२१.
प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरीताई भदाणे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष शिवमती विद्याताई गडाख आणि मुंबई- कोकण विभागीय अध्यक्ष शिवमती डॉ. निता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवमती अंजली भोसले मुंबई जिल्हा अध्यक्ष, शिवमती गीतांजली टेमगिरे- मुंबई जिल्हा उपाध्यक्ष, शिवमती सुनीता पाटील मराठा सेवा संघ, शिवश्री एकनाथ देशमुख ठाणे जिल्हा सचिव- संभाजी ब्रिगेड, शिवश्री जगन्नाथ केदार मराठा सेवा संघ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, शिवश्री हनुमंत जाधव-संभाजी ब्रिगेड आणि शिवश्री डॉ. अमितकुमार गोईलकर- संभाजी ब्रिगेड यांच्या उपस्थितीत जिजाऊ ब्रिगेडची मुंबई-कोकण विभागीय सभा मराठा सेवा संघ कोपरी ठाणे पूर्व येथील कार्यालयात पार पडली. सभेत शिवमती विद्याताई गडाख यांनी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर कक्ष यांच्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुंबई कोकण विभागीय अध्यक्ष शिवमती डॉ. निता पाटील यांनी जास्तीत जास्त महिलांनी जिजाऊ ब्रिगेडमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. आणि भविष्यात सदस्य नोंदणी अभियान राबवत असल्याचे सांगितले. तसेच आपण संघटितपणे कशा प्रकारे कामं करू शकतो याची माहिती दिली.सभेमध्ये मुंबई आणि उपनगरातील कार्यकारिणीसाठी नवीन पद नियुक्या करण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे- शिवमती एकता देशमुख- ठाणे जिल्हा अध्यक्ष, शिवमती स्वाती केत ऐरोली शहर अध्यक्ष, शिवमती संजीवनी मांडे- ऐरोली उपाध्यक्ष, शिवमती सुप्रिया आचरेकर कल्याण- डोंबिवली महानगर अध्यक्ष, शिवमती मनीषा माने टिटवाळा शहर व ग्रामीण अध्यक्ष,शिवमती संपदा कदम- टिटवाळा श/ग्रा उपाध्यक्ष, शिवमती मीरा वाघमारे टिटवाळा जनसंपर्क प्रमुखपदी नियुक्त्या आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शिवमती गीतांजली टेमगिरे यांनी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये कार्यालय प्रमुखांच्या दालनात स्वराज्यसंस्थापिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची प्रतिमा लावली जावी अशा मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना देण्याविषयी ठराव मांडला आणि हा ठराव एकमताने संमत करण्यात आला. तसे निवेदन लवकरच मा मुख्यमंत्री यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार देण्यात येईल असे ठरवण्यात आले. नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यात आले.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे,पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here