१३ वर्षे पूर्वीचा शेतीचा वाद पोलिसांनी व गावकर्यांनी मिटविला

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील पोलीस चौकी ही कोणत्या न कोणत्या प्रकरणामुळे चर्चेत असते केळगाव येथील १ सुनील पुंडलिक इंगळे ,२ हर्षल पुंडलिक इंगळे व १ दीपक पुंडलिक इंगळे, २ अनिल पुंडलीक इंगळे (सावत्र भाऊ-भाऊ)यांच्या मध्ये गेल्या १३ ते १५ वर्षापासून शेतीच्या वादातून मुलाच्या हातून बापाचा खून झाला होता .यातुन दीपक यास ११ वर्ष तुरुंगवास सोसावा लागला होता .त्यानंतर सुटका झाल्यानंतर त्यांच्यात शेतीच्या कारणावरून वाद होत होता,त्यातच मागील २० -२५ दिवसापूर्वी त्यांच्यात वाद होऊन आमठाना पोलीस चौकी मध्ये एकमेकाविरुद्ध दाखल पात्र गुन्हा दाखल झाला होता .मात्र सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रंगराव बावस्कर ,पोलीस नाईक आर के यांनी केळगाव येथील प्रतीष्ठीत नागरिक व पोलीस पाटील (पती ) बाळासाहेब इवरे (सामाजिक कार्यकर्ता) यांच्या सहकार्याने त्यांच्यात समजूत घालत गावातील नागरिकांच्या व पोलिसांच्या समक्ष एकमेकांच्या सहमतीने त्यांच्या शेतीची वाटणी करून दिली व सदर वादास अखेर १३वर्षा नंतर पूर्ण विराम मिळाला आहे.ग्रामीण भागात अनेकदा ९०% हे वाद शेतजमिनीवरूनच होतात अशा वादातून अनेकदा किरकोळ वादानंतर सदरील वाद वाढतात यावर आळा घालण्यासाठी आम्ही पोलीस आपल्या बांधावर या संकल्पनेतून हा वाद संपुष्टात आणला आणी दोन्ही गटांना समोरासमोर बोलावून व्यवस्थित मार्गदर्शन केले त्यामुळे सदरील वाद मिटला त्यामुळे कोर्ट कचेरीत वेळ पैसा या दोन्हीही गोष्टी वाचल्यामूळे वाद पोलीस आपल्या बांधावर या संकल्पनेतुन वाद मिल्याचे समाधान लाभले
किरण बिडवे ,सहाय्यक पोलीस निरिक्षक,ग्रामीण पोलीस ठाणे, सदरील वाद गेल्या १३ते १५ वर्षापासुन होता या वादातुन एक खुनही झाला होता परंतू या वादातुन काहीच निष्पन्न होत नव्हते त्यातच आमची तक्रार पोलीस चौकीत गेल्यानंतर पोलीसांनी बांधावर येवुन ग्रामस्थांच्या मदतीने हा वाद मिटविला याबद्दल पोलीसांचे आम्ही आभारी आहोत परंतू वाद मिटल्याने आनंदी व समाधानीही आहोत,दिपक ईंगळे शेतकरी केळगाव ता सिल्लोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here