शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा २५ वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन

0

मनमाड I प्रतिनिधी- “शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा २५ वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन मातोश्री मंगल कार्यालय नांदेड येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीचे प्रणेते प्रा.मनोहरराव धोंडे सर म्हणाले की 28 जानेवारी 1996 ला स्थापन झालेल्या शिवा संघटनेच्या गेल्या 25 वर्षात वीरशैव-लिंगायतांचे व बहुजनांचे समाजहितांचे कार्य करताना,अनेकदा संघर्ष, मोर्चे, अंदोलने करताना हजारो शिवा मावळ्यांच्या योगदानानेच व कडवट मावळ्यांच्या बळावर कठोर लढा देत कुणाच्या केसालाही धक्का न लावू देता यश संपादन करता आले,असे धोंडे स्पष्टपणे सांगितले.” शिवाचा विचार “हा व्यक्तीपुरता मर्यादित नसुन समाजाच्या उन्नतीसाठी शेवटच्या घटकापर्यंत हा विचार सामान्यापर्यंत आपणा सर्वांना अजून घेऊन जायच आहे.क्रांती घडवायची असेल तर उपाशी पोटीच घडवली जाते हा इतिहास असुन शिवाचा मावळा गरीब असला तरी तो विचाराने सक्षम आहे व हे शिवा चे वैचारिक वादळ कुणी थांबवू शकत नाही असे वीरशैवलिंगायतह्रदयसम्राट धोंडे सरांनी ठणकावून सांगितले.28 जानेवारी 1996 ला सिडको नांदेड येथील शिवलिंगेश्वर मंदिरात स्थापन झालेल्या शिवा संघटनेचे आज महाराष्ट्रात 3500 अन्य राज्यात 1800 व बाहेर देशात ही काही शाखा अशा एकुण 5300 ते 5500 शाखा स्थापन करुन जोमाने कार्य चालू असल्याच सांगत हे करताना आजपर्यंत समाजबांधवांकडून एक रुपयाचीही अपेक्षा न करता समाजाला सामाजिक संरक्षणासह आरक्षणाचाही लढा लढुन अनेक संघर्ष करुन 2005 ला ओबीसीची मागणी लावून धरुन 2014 पर्यंत ते संघटनेच्या प्रयत्नातून यश मिळवून राज्यात एकुण वीरशैव लिंगायत समाजातील *21 जातींना ओबीसीमध्ये* आणलेल आहे असही *प्रा.धोंडे सरांनी* घटनाक्रम देत स्पष्ट केले. व केंद्राकडेही ही मागणी असुन लवकरच ती मागणी पुर्णत्वास येईल असे सांगत यासाठी संघटना कटीबद्ध असल्याचे धोंडे सर म्हणाले.आरक्षणाच्या वेळेसही काही नतभ्रष्ट लोकांनी धर्माच्या नावाखाली नेतेगीरीची हौस भागवण्यासाठी शिवा संघटनेने मिळविलेल्या आरक्षणाच्या कार्यात खोडा घालण्याच काम करुन समाजाच यात नुकसान झाले असल्याचे म्हणत हे पाप ही मंडळी फेडू शकणार नाहीत असही सरांनी अतिशय संतापाने बोलले. याकडे समाजानेही अशा दळभद्री व वेळोवेळी स्वार्थासाठी संघटनेची अनेक नावे बदलून काहीतरी केल्याचा आव आणणाय्रा लोकांपासून सावध रहायला हवे असे म्हणाले. व यंदाच्या होणाऱ्या “जणगणनेत धर्माच्या रकान्यात रकाना Column No.7 मध्ये “वीरशैव-लिंगायत धर्म” अशीच योग्य नोंद करावी असे सर्वांच्या संमतीने एकमताने ठराव करण्यात आला, असुन सर्व समाजबांधवांपर्यंत ही योग्य नोंद करण्यासाठी प्रसार व प्रचार सर्वांनी करावे असे आवाहन प्रा.धोंडे सरांनी केले.गेल्या 25 वर्षातील शिवा संघटनेने समाजावर व विविध मठावर,मठाधिपतींवर,समाजातील गोरगरिबांना झालेल्या अन्यायावर प्रत्येक ठिकाणी धावून आली व कसलीही पर्वा न करता अंगावर अनेक केसेस घेऊन न्याय मिळवून दिला असल्याचे अनेक उदाहरणे देत सरांनी दाखले दिले* यात *मानूर मठ,शिरड शहापुरचा मठ,अचलेरचा लढा,ठाणे घोडबंदर प्रकरण* अशा काही प्रकरणांचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगत याचा सरांनी आवर्जून उल्लेख केला.यात समाजाला व कार्यकर्त्यांना कसलीही झळ पोहचू न देता लढे यशश्वीरित्या जिंकले असल्याचेही धोंडे सरांनी* सांगितले. व काही महत्वाचे ठराव सर्वानूमते मंजूर केले.येत्या काळात संघटनेच्या *पंचसुत्रीच्या* कार्यक्रमाचा उल्लेख करत संघटनेच्या कार्याचे खंड प्रकाशन, शिवा सृष्टी ,मुख्यालयाच्या निर्मितीसाठी सर्वांनी योगदान देण्यासोबतच येणाऱ्या काही दिवसात युवा वर्गाला संधी देत महाराष्ट्र व अन्य राज्यातील सर्व शाखा पुनररचना करण्यास सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, विभागप्रमुख जिल्हाप्रमुख आदिंना आदेश दिले. लवकरच त्याची अंमलबजावणी व्हावी असे सांगितले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणुन तेलंगणातील गुरुवर्य स्वामी, आमदार मोहन अण्णा हांबर्डे,आमदार राम पा रातोळीकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर,जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,महापौर मोहीनीताई येवणकर,नगरसेवक किशोर स्वामी,जि.प.बांधकाम सभापती संजय आप्पा बेळगे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार सर,राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत आप्पा शेटे, राज्य उपाध्यक्ष वैजनाथ अण्णा तोनसुरे,पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे सर, शिवा कर्मचारी महासंघ राज्यसरचिटनीस विठ्ठलराव ताकबीडे सर,शिवा कर्मचारी महासंघाचे मराठवाडा प्रमुख संजय कोठाळे सर आदिंनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा* आपल्या मनोगतातून दिल्या.
प्रसंगी शिवा व्यासपीठावर शिवा संघटनेचे राज्यसरचिटनीस धन्यकुमार शिवणकर सर,शैलेश अण्णा जकापुरे,रुपेश होणराव सर,प्रा.किशन आप्पा सुनील अप्पा वाडकर,अर्जुन सैदाने,अरविंद भडोळे,राजू बोंते,शिवा सोशलमिडीया चे प्रदेशाध्यक्ष मनीष आप्पा पंधाडे,शि.भ.प.मन्मथ अप्पा डांगे गुरुजी शि.भ.प.शिवशरण रटकलकर गुरुजी,नांदेड जिल्हाध्यक्ष संभाजी पा बुड्डे सर,विरभद्र बसापुरे सर,दिगांबर मांजरमकर सर,शंकर अण्णा पत्रे, यांच्यासह महाराष्ट्र व अन्य राज्यातून हजारोंच्या संख्येने आलेले वीरशैव-लिंगायत समाजबांधव राज्य व विभागीय पदाधिकारी, जिल्हापदाधिकारी,मान्यवर व शिवा महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, व्यापारी आघाडी, कर्मचारी महासंघ,शिवा सोशलमिडीया व शिवा मावळे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे *सुत्रसंचालन चंद्रकांत अमलापूरे सर यांनी केले तर हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचे काम नियोजन समीतीचे अध्यक्ष ईंजिनियर अनिल माळगे सर,* यांनी आपल्या सुंदर कौशल्याने नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here