अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची मासिक बैठक नुकतीच संपन्न.

0

मुंबई – अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची मासिक बैठक नुकतीच संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकी मध्ये संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख महेश्वर तेटांबे, बाळासाहेब गोरे, गणेश पिल्लई, सतशील मेश्राम,राजू शेवाळे, राजेंद्र बोडारे, नागेश गंगावणे,संजय कांबळे आदि सभासद उपस्थितीत होते.सदर बैठकीत खालील निर्णय घेण्यांत आले.१) सन २०२१ करिता महाराष्ट्र व मुंबईच्या कमिटीचे गठन करावे. परंतु ते करत असताना जे सभासद स्वत: क्रियेशीलपणे संघटनेमध्ये ५० नवीन सभासद करतील अशा सभासदाला पदाधिकारी करण्यांत येईल. २) संघटनेच्यावतीने एप्रिलच्या २९ व ३० रोजी दोन दिवसीय चित्रपट संम्मेलन नाशिक मध्ये आयोजित करण्याविषयी चर्चा करण्यांत आली.३) त्याकरीता संम्मेलन आयोजन कमिटी गठीत करण्यांत येईल. त्यामध्ये तज्ञ व्यक्तिंचा समावेश असावा. ४) संघटनेचे दैनंदिन कार्य सुरळीत चालू राहण्याकरीता निधीची उभारणी करणे.५) संघटनेच्या वतीने प्रकाशित करण्यांत येणार्‍या कॅलेंडरचे अनावरण मा.मंत्रीमहोदयांच्या हस्ते येत्या ३० तारखेपर्यंत करावे. त्याबाबतची सूचना सभासदांना देण्यांत येईल. असे सर्वानुमते ठरविण्यात आले.आपला,देवेंद्र मोरे,अध्यक्ष- अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ,महेश्वर भिकाजी तेटांबे,सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here