मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे ध्वजारोहण समारंभ संपन्न

0

मालेगाव – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी हुतात्मा स्मारक, श्रीराम नगर, छत्रपती शिवाजी महाराज जिमखान्या शेजारी, संगमेश्वर, मालेगाव येथे मालेगाव महानगर पालिका प्रभाग कार्यालय व आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी विशेष सरकारी वकील अँड शिशिर हिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मालेगाव महानगर पालिका प्रभाग क्रमांक १ चे प्रभाग अधिकारी हरिष डिबर, समितिचे निखिल पवार, देवा पाटील, प्रवीण चौधरी, रविराज सोनार, अविनाश निकम, कुंदन चव्हाण, राकेश डिडवानीया, सुशांत कुलकर्णी, अतुल लोढा, प्रितेश शर्मा, शरद पाटील, केशव सुर्यवंशी, मानद वन्यजीव संरक्षक अमित खरे, आप्पाजी महाले, कपिल डांगचे, क्षितिजा सोनार मनपा प्रभाग कार्यालयचे समसुद्दिन शेख, पंकज सोनवणे, सुनील खैरनार, सचिन भामरे, जनार्दन खैरनार, शिवाजी जाधव, सजन पाटील समाधान गायकवाड आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here