देसराणे येथे बुलेट मोटार सायकलची चोरी, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.

0

कळवण प्रतिनिधी ( महेश कुवर) कळवण तालुक्यातील देसराणे येथील राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बुलेट मोटार सायकल चोरून नेल्याने परिसरात खळवळ उडाली आहे.याबाबत वृत्त असे की देसराणे येथील महेंद्र केदाजी हिरे यांच्या गावाजवळील घराजवळ बुलेट मोटार व इतर वाहने लावलेली होती. दि. २२ जानेवारी रोजी रात्रीच्या १ ते १:३० च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बुलेट मोटार सायकल ( एम.एच.१५ ई.डी. १५) ही लाल रंगाची गाडी चोरून नेली. सकाळी हिरे कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आल्याने आजूबाजूला मळ्यात,वाडी वस्त्यांवर मोटार सायकलची पाहणी केली मात्र गाडी मिळून आली नाही. त्यानंतर कळवण पोलिसात मोटार सायकल चोरीची तक्रार दाखल केली.ग्रामीण व आदिवासी भागातून ही असे चोरीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कळवण पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here