धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वज फडकवत ध्वजाला सलामी देत ध्वजारोहण व पूजन

0

येवला – आज दिनांक 26 जानेवारी २०२१ रोजी तालुक्यातील धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वज फडकवत ध्वजाला सलामी देत ध्वजारोहण व पूजन वि. विकास कार्यकारी सोसायटी चे माजी चेअरमन आप्पासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामुदायिक राष्ट्रगीत व ध्वज गीत घेऊन ध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी शालेय व्यवस्थापन व शिक्षक यांच्याकडून कोरोनाचा पार्श्वभूमीवर पाचवी ते आठवी शाळा सुरू करण्याच्या नियमाचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले शिक्षकांबरोबरच विद्यार्थी व पालक यांनीही आपल्या स्वतःची काळजी घेत आपल्या पाल्याला शाळेत लागणारी मास्क टायझर सामग्रीचा वापर करत कोरोनावर मात करायची तयारी करण्यासाठी सूचित केले,यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना शालेय ड्रेसचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक सय्यद सर, पोतदार सर, दरेकर सर व आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक व अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका तसेच माजी सरपंच कैलास खोडके, उपसरपंच शशिकांत जगताप, माणिकराव सूर्यवंशी, दत्तात्रय गायकवाड, विक्रम गायकवाड, वडीतके साहेब,योगेश गायकवाड, दिनेश गायकवाड, योगेश सोमवंशी, बाबासाहेब गायकवाड, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, बापू ठाकरे, विलास खोडके, दिपक गायकवाड, नारायण बाराते, संतोष गायकवाड पोलीस टाईम प्रतिनिधी सह ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here