सिल्लोड धुळे बस बंद प्रवाशांचे हाल.

0

सिल्लोड प्रतिनिधी ( विनोद हिंगमिरे) घाटनांद्रा सह परिसरातील नागरिकांची  कित्येक दिवसापासून ची असलेली घाटनांद्रा मार्गे सिल्लोड धुळे बस सेवा सुरू करण्याची मागणी सिल्लोड आगार आणि पूर्ण केली होती त्या बसचे घाटनांद्रा सह आमठाणा या गावांमध्ये  चालक व वाहक यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले मात्र जेमतेम पंधरा दिवस चाललेल्या या बस सेवा पुन्हा बंद करण्यात आली त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे घाटनांद्रा गावाला लागून छोटे-मोठे गाव असून त्या गावातील नागरिकांना गुजरात धुळे पाचोरा जळगाव जाण्यासाठी ही  बस सोयीस्कर होती त्यामुळे हळूहळू प्रवासी बस ची वाट पाहत बसत मात्र अचानक ही बस बंद केल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे आधीच्या रस्त्यावर बसची संख्या कमी व सकाळी लवकर पाचोरा व खानदेश भागात जाण्यासाठी सिल्लोड धुळे बसला प्रवाशांची गर्दी असायची मात्र ही बस बंद केल्यामुळे प्रवाशांमधून नाराजीचा सूर निघत आहे व घाटनांद्रा इथून एकही लांब पल्ल्याची बस नसल्याने सिल्लोड आगारांनी बंद केलेली सिल्लोड धुळे बस सेवा पूर्ववत करावी अशी मागणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आकाश गुळवे संतोष मिसेन राजाराम पालोदकर निलेश बिसेन विनायक मोरे गोपाल गवरे व परिसरातील नागरिकांनी केली आहे. याविषयी सिल्लोड बस डेपो चे मॅनेजर प्रवीण भोंदवे यांना सिल्लोड धुळे बस विषयी विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभला व लांब पल्ल्याची बस असून उत्पन्नही कमी आले त्यामुळे ही बस सध्या बंद करण्यात आली मात्र पुन्हा गरज वाटल्यास किंवा मागणी वाढल्यास ही बस पुन्हा सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here