संघर्ष समितीची सिडको अधिकाऱ्यांना विनवणी

0

पनवेल: कळंबोली -रोडपाली लिंक रोड, खारघर सेक्टर 10, नवीन पनवेल रेल्वे स्टेशन आदी परिसरातील नादुरुस्त पथदिवे त्वरित बदलावे आणि शहरातील अंधार दूर करावा, अशी मागणी करताच सिडकोचे अभियांत्रिकी विभागाचे अभियंता वाय. एम. एस. मापरा यांनी आठवडाभरात सर्व दुरुस्ती करून शहरे उजळतील असे आश्वासन पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, संपर्कप्रमुख भास्करराव चव्हाण, संघटक मल्लिनाथ गायकवाड, खारघर शहर अध्यक्ष तुकाराम कंठाळे, पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे, तळोजा विभागीय अध्यक्ष सुनील भोईर, प्रदीप बावस्कर आदी जणांचा सहभाग होता. मापरा यांच्या समवेत त्यांचे सहकारी अधिकारी कांबळे उपस्थित होते.
कळंबोली शहरात अवैध धंद्यासाठी अंधाराचे साम्राज्य पसरावे म्हणून काही समाजकंटक दगड मारून पथदीवे फोडत असल्याच्या घटना उघडकिस आल्याचे चर्चेच्या वेळी समोर आले. तर काहींनी अवैधरित्या विद्युत जोडणी करून पथदिव्यांच्या खांबावरून चोरून विद्युत पुरवठा घेतला असूनही सिडकोच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबींची नोंद मापरा यांनी घेतली आहे.
खारघर येथील विद्युत विभागाच्या मुख्यालयातील अधिकारी गौतम यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. आठवडाभरात तेथील पथदिवे आणि गार्डन परिसर उजळेल असे त्यांनी वचन दिले आहे.
तसेच नवीन पनवेल, कळंबोली, रोडपाली कोळीवाडा जेटी आदी भागातील अंधार पनवेल संघर्ष समितीच्या दणक्याने सरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here