ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा, मनमाड ची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा, मनमाड ची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओपन लाईन शाखा‌ चे अध्यक्ष आयु.प्रदिपभाऊ गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव आयु.सतिशभाऊ केदारे,झोनल कार्यकारिणी सदस्यआयु. प्रविण आहीरे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, ओपन लाईन चे सचिव आयु.रत्नदिप पगारे,ओपन लाईन शाखा चे खजिनदार सम्राट गरूड , कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी उपस्थित होते. यावेळी झोनल सचिव आयु.सतिश भाऊ केदारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले तर सचिव रत्नदिप पगारे यांनी मागील वर्षी चा सचिवाचा अहवाल सादर केला, कोषाध्यक्ष सम्राट गरूड यांनी मागील वर्षी चा जमा-खर्च सादर केला.प्रविण अहिरे, प्रदीपभाऊ गायकवाड,सागर गरूड, रोहित भोसले आदी ची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अजित जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप,आनंद संसारे, विजय गायकवाड, गणेश थोरात, सुरेश अहिरे, भिमराव धिवर,प्रेम खडताळे आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here