श्री दत्तगुरु प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न…

0

मनमाड – श्री दत्तगुरु प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रांत अग्रेसर असते. सालाबाद प्रमाणे नूतनवर्षाचे तसेच १० व्या वर्धापनदिनचे औचित्य साधून माजी नगरसेवक सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्यसम्राट नगरसेवक रमाकांत रहाटे (अध्यक्ष प्रभाग समितीवार्ड क्रमांक ए, बी आणि ई वार्ड) यांच्या शुभहस्ते श्री दत्तगुरु प्रतिष्ठान कार्यालय, कामाठीपुरा, मुंबई येथे नुकतेच दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री दत्तगुरु प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लकेश्री यांनी संस्थेचे प्रास्ताविक करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. याप्रसंगी अभिनेते बबन जोशी, पत्रकार महेश्वर तेटांबे, निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक लियाकत सय्यद साहेब, मुर्तुझा हार्डवेअरवाला, जुजर पाटनवाला, दत्ताराम वंजारे, राजेश्वर जोगू, दत्ताराम मुलूक, महिला समाजसेवीका संगीता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक लियाकत सय्यद साहेब यांनी लकेश्री साहेबांच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे पत्रकार महेश्वर तेटांबे, नगरसेवक सुरेश काळे आणि अभिनेते बबन जोशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आपल्या उद्घाटनपर भाषणांत नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल तसेच लकेश्री यांच्या समाजसेवेची दखल घेऊन संस्थेला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते उपस्थित पत्रकार, समाजसेवक, महिला, कार्यकर्ते यांना दिनदर्शिकेच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे चिटणीस दत्ताराम मुलूक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे (पत्रकार) ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here