- सिल्लोड : प्रतिनिधी – सिल्लोड तालुक्यातील मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून तर निकाल लागेपर्यंत निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशीलवार लेखाजोखा मुदतीच्या आत सादर करणे बंधनकारक असतांनाही सादर न केल्यावरही आयोगाकडून पुन्हा संधी देण्यात आलेली होती. परंतु मिळालेल्या त्या संधीच्या वेळेतही काहिजनाकडून खर्चाचा तपशील सादर न करणे महागात करण्यात आलेला नसल्याने अशा जवळपास ३०६ जनानांवर सहा वर्षासाठी अपात्रतेची कारवाई झालेली आहे. अपात्रतेची कारवाईमुळे तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी राजकारण्यांना या निवडणुकीत उमेदवार होण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. अपात्र झालेल्या त्या सर्व इच्छुकांना या निवडणुकीत उमेदवारी दाखल करता येणार नसल्याने ईच्छा जनमत असूनही तांत्रिक अडचणीमुळे निवडणूक लढता येणार नाही.सिल्लोड तालुक्यातील १०३ ग्रामपंचायत निवडणुका तीन टप्यात झालेल्या होत्या, त्यातील ८४ ग्रामपंचायत निवडणुका या सत्रात पार पडणार होत्या परंतु नानेगाव जंजाळा या ग्रुप ग्रामपंचायतची फोड झाली असून नानेगाव व जंजाळा या नव्याने दोन ग्रामपंचायत अस्तित्वात आलेल्या आहेत.या ग्रामपंचायतसाठी शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झालेले नसल्याने सदरील ग्रामपंचायत निवडणूक या टप्यात होणारे नाही, त्यामुळे ८३ ग्रामपंचायत निवडणुका या टप्यात होत आहेत. तालुक्यातील १०३ ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्यापैकी ३०६ जणांनी निवडणूक खर्चाचा तपशील विहित मुदतीत सादर केला.त्यानंतर आयोगाकडून एक संधी देण्यात अली होती. यातील काहींनी निवडणूक विभागाची नोटीस गंभीरपणे घेतली नाही व खर्चाचा तपशील सादर केला नसल्याने त्या व्यक्तींना आयोगाने ६ वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेले असल्याने त्यांना सदरील निवडणुकीत उमेदवारी दाखल करता येणार नाही.आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खर्च मर्यादा निश्चित केली असून ७ ते ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत २५ हजार तर ११ ते १३ सदस्य संख्येसाठी ३५ हजार व १५ ते १७ सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक खर्च ५० हजार मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दर तीन दिवसांत विहित नमुन्यात खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक असून नसता सदस्यत्व रद्द होण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.सिल्लोड तालुक्यातील १०३ ग्रामपंचायत निवडणुकीत मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून नामांकन मागे घेणाऱ्या व निवडणूक लढणाऱ्या अशा ३०६ जणांनी निवडणुकीत केलेला खर्चाचा तपशील सादर केला.आयोगाकडून त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आली होती. त्या संधीच्या वेळेत प्राप्त नोटीस गांभीर्याने घेतली नाही.खर्चाचा तपशील सादर केला नाही म्हणुन त्यांना सहा वर्षासाठी अपात्र ठरविण्यात आलेले असल्याने या निवडणुकीत अशा अपात्र व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्यांचे उमेदवारी अर्ज अपात्रतेच्या कारवाईमुळे रद्द करण्यात येतील.
विक्रम राजपूत, तहसीलदार सिल्लोड,