आरक्षण रद्द झाल्याने उघडली संधीचीदारे, सर्वच इच्छूक बनले भावी सरपंच.

0

सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२९) — ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण नव्याने जाहीर होणार असल्याने आता या निवडणुकीत वेगळाच रंग आला आहे. सदस्य निवडणुकीच्या आधी सोडतीतून काढण्यात आलेले आरक्षण ग्रामविकास मंत्रालयाकडून रद्द करण्यात आल्याने निराश झालेल्या अनेकांसाठी संधीची दारे नव्याने पुन्हा उघडली असून संधी प्राप्त झाली आहे. परिणामी आता सर्वच इच्छुक भावी सरपंच बनले आहेत . शिवाय निवडणुकीत होणारा घोडेबाजार यांबून सर्वसामान्य उमेदवारांना न्याय मिळणार आहे, तर विरोधकांशी आतून हातमिळवणी करून मतदारांना वेठीस धरणाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार असल्याने आता सगळेच इच्छुक उमेदवार मोर्चे बांधणीला लागले आहेत . आतापर्यंत निवडणुकीपूर्वी सरपंचपद आरक्षित होत असल्याने संबंधित प्रवर्गातील उमेदवार देण्याची व्यवस्थाकेली जात होती. आता तसे होणार नसल्यानेगावातील पुढाऱ्यांच्या मनमानीला चांगलाच चाप बसणार आहे. तसेच सरपंचपद महिला राखीव असेल तर गावातील समाजकारण व राजकारणाशी काहीएक देणे घेणे नसणाऱ्या मात्र पुढाऱ्यांच्या जवळीक असेल घरातील अथवा कुटुंबातील महिलेला निवडणुकीत उभे करून निवडून आणले जात असे. त्यामुळे अशाच कुटुंबातील महिला सरपंच होणार हे ठरलेले असायचे. गावातील बलाढ्य पुढाऱ्यांच्या घरातील किंवा त्याच्या प्रभावाने काम करणारा सरपंचपदाचा उमेदवार ठरवला जाण्याचे जवळजवळ ठरलेलेच होते.अनेकदा एकाच घरातील सदस्य सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ठरलेलेच. इतकेच नाही तर ग्राम पंचायतीचे सदस्यही पंधरा ते वीस वर्षे सारखेच राहत असत. आता नवीन निर्णयामुळे या गोष्टीवर आपोआपच नियत्रंण येणार असल्याने तसेच खऱ्या आरक्षित माणसाला न्याय मिळणार असल्याने मतदारांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागात जोरदार स्वागत करण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यातील एकुण ८३, ग्रामपंचायतीत आगामी काळात निवडनूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामिण भागातील राजकीय वातावरण गुलाबी बोचऱ्या थंडीत चांगलेच गरमागरम तापल्याचे दिसत आहे. गाववाड्याचा मुखीया होण्याचा बहुमान मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरील निवडणुका प्रतिष्ठेची केली आहे. आताच्या घडली गावातील प्रत्येक इच्छुक गावाचा कारभारी म्हणुन फिरत आहे. गावाचा कारभारी निडवण्यासाठी गावातील चौकाचौकात बैठका चर्चा आता थांबल्या आहेत कारण प्रत्येकजण भावी कारभारी म्हणून गावातल्या कारभारात रमुन गेल्याचे चित्र दिसुन येत आहे. २३ डिसेंबर पासून नामनिर्देशन प्रकिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज आला नाही. परंतु दुसऱ्या १९ नामांकन आवेदन पत्र प्राप्त झाले आहे. तीन दिवसांच्या सुट्टी नंतर सोमवार रोजी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.१५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. त्या अनुषंगाने गावोगावच्या आजी माजी स्थानिक पुढार्यांनी निवडणुकीची पुर्व तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नव्या सालात ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा चांगलाच पेटणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here