सिल्लोड शहरातील बुलेट व इतर वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाला लगाम घालण्यासाठी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) सिल्लोड शहरातील बुलेट व इतर वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाला लगाम घालण्यासाठी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून दोन दिवसात आंबेडकर चौक येथे नाकाबंदी करून दहा बुलेट धारकांवर कारवाई केल्याबाबत ची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी सांBजवार्ता ला बोलताना दिली,सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने कर्णकर्कश आवाज करणारी बुलेट व इतर मोटारसायकली भरधाव वेगात पळविणाऱ्या दिवट्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी म्हणून आणि सुज्ञ नागरिकांनी मागणी केली होती या संबंधित वृत्त दैनिक mb news 24tass ने प्रसिद्ध केल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी या वृत्ताची दखल घेऊन सिल्लोड शहरातील आंबेडकर चौक व प्रियदर्शनी चौक या ठिकाणी दोन दिवसा पूर्वी नाकाबंदी केली व या नाका-बंदी दरम्यान कर्णकर्कश आवाज करणारी आठ ते दहा मोटरसायकली शहर पोलीस ठाण्यात आणून जमा केलेल्या सदरील मोटरसायकलचे मूळ कागदपत्रे तपासण्यात येणार असून कर्णकर्कश आवाज करणारी सायलेन्सर काढून त्या जागी मूळ सायलेन्सर लावण्या बाबतच्या सक्त ताकीद संबंधितांना देण्यात आली आहे सदरील कारवाईही यापुढे सुरू राहणार असून अशा वाहनधारकांनी वेळीच आपल्या वाहनांची सायलेन्सर बदलून घ्यावी नसता त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा खात इशारा पोलीस निरीक्षक बोकडे यांनी दिला आहे,शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईच सिल्लोड शहरातील नागरिकांनि स्वागत केले असून पोलीस प्रशासन व याबद्दल समाधान व्यक्त केले आहे व ही कारवाई अशीच सुरू ठेवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here