जागतिक अपंग दिन व आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) भराडी येथे,आज जागतिक अपंग दिन असल्याने जिल्हा परिषद प्रशाला सिल्लोड येथील दिव्यांग माध्यमिक शिक्षक संजय कुमावत कासोदकर यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ फुलंब्री येथील आधार अनाथ आश्रमातील 24 अनाथ मुलांना 24 ड्रेसचे वाटप केले. याप्रसंगी श्री.विलास शेरकर,श्री.निकम ,श्री.ताठे , श्रीमती भोसले ,कु.मानसी कुमावत,पार्थ कुमावत व अनाथ आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी संजय कुमावत यांनी दिव्यांग विध्यार्थ्याशी संवाद साधत स्वजीवणात जे काही चांगले, वाईट अनुभव आले ते कथन करून दिव्यांगणी काय काळजी घ्यायची व जनतेने काय सहकार्य करावे याबाबत मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here