
मुंबई – ( बदलापूर शैलेश सणस )प्रेरणा फाउंडेशन रजि. 564/एफ 38784/बदलापूर/ठाणे /महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने विकलांग गरजू लोकांना कॉम्पुटर वाटपाचा कार्यक्रम केला.
कोरोना वायरस च्या धुमाकुळामुळे आपली कामाची गती मंदावली आहे. लहान लघु उद्योग, मोठे उद्योग, कॉलेज, शाळा सर्व ठिकाणी कोरोना महामारीचा परिणाम झाला आहे. 7 ते 8 महिने झाले आपण कोरोना या आजाराशी सर्व जण लढा देत आहोत त्यामुळे या कोरोना परिस्थितीमुळे सर्व शक्य होईल त्या उद्योगांचे काम , शाळा, कॉलेज मधील शिक्षण हे घरी च ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. पण काही गरजू विकलांग लोकांनी त्यांच्या पायावर उभे राहावे जेणेकरून त्यांना स्वतःच्या व्यवसाय सुरु करता येईल म्हणून प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका दीप्ती (प्रेरणा) गावकर व .संजीव सुरेशचंद्र जैन. प्रेरणा फाऊंडेशन तर्फे आज दि. 03/12/2020 गुरुवार रोजी अपंगदिनानिमित्त विकलांग गरजू या लोकांना “इंटेग्रेवोन मॅनेज्ड सोल्युशन” या कंपनीच्या विदयमाने कॉप्युटर वाटपाचा कार्यक्रम प्रेरणा फाउंडेशन अंर्तगत करण्यात आला. सध्याचे युग हे डिजिटल झाले आहे त्यामुळे सर्वांना कॉम्पुटर चे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रेरणा फाउंडेशन तर्फे इंटिग्रेव्हॅन कंपनी चा एक छोटासा प्रयत्न यशस्वी झाला
कॉम्पुटर वाटप हे खालील गरजू विकलांग लोकांना वाटप करण्यात आले.
1) श्री. खंडू कोटकर,
2)प्रवीण पाटील,
3)हिरामण कचरू मनोहर
4) प्रकाश बेलखेडे
5) सौ. वैशाली चांदेकर,तसेच श्री. संजीव सुरेशचंद्र जैन यांनी आतापर्यंत प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत 200 कॉम्पुटर वाटप केले आहे,श्री. संजीव सुरेशचंद्र जैन यांना प्रेरणा फाउंडेशन तर्फे दानवीर कर्ण गौरव पुरस्कार प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका दिप्ती (प्रेरणा) गाकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात प्रेरणा फाउंडेशन अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी व्यवसायाचे डिजिटल युगाचे महत्त्व सांगून सर्वांना मार्गदशन केले. या कार्यक्रमाला उपसचिव दिलेश देसाई व उपखजिनदार दिव्या गावकर उपाध्यक्ष श्री. विनायक चांदेकर व सौ. वैशाली विनायक चांदेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इंटिग्रेवोन कंपनीचे स्टाफ अर्चिता पांडे प्रवीण जाधव अर्चित पांडा समाजसेवक हिरामण कचरू दादा व दिव्या गावकर त्यांनीही समाजसेवा विषयावर मार्गदर्दशन केले त्याचेही प्रमाणपत्रक देऊन सत्कार करण्यात आले . विकलांग लोकांना शर्ट स्वरूपात विकास पवार या समाजसेवकांकडून भेट देण्यात आली सर्व विकलांग लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या ..व संस्थापिका प्रेरणा फाउंडेशन नेहमी गोरगरिबांच्या सेवेत हजर असेलअसे आस्वासन दीप्ती गावकर यांनी दिले व कार्यक्रमाची सांगता झाली
