शिक्षण विभागाला ठेंगा दाखवत अजिंठ्यातील इंगजी शाळा पहिल्या वर्गापासून सुरू

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) शिक्षण विभागाने फक्त 9 ते 12 वर्ग सुरू करण्याचीच परवानगी दिली असतांना अजिंठ्यातील अजंटा लर्निंग हब या इंग्रजी शाळेने मात्र ह्या नियमाला केराची टोपली दाखवत 1 ली ते 10 वर्ग सुरू केले आहेत.या मागे पालकांकडून मागील राहिलेली व सध्याची भरमसाट फिज वसूल करण्याची “शाळा” होत आहे.यावर मात्र शिक्षण विभाग मूग गिळून गप्प आहे.शाळेची मजाल एवढ्या वरच थांबत नसून आर.टी.ई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना हेतुपुरस्पर डावलून प्रवेश नाकारण्यात येत आहे.या प्रकाराबाबत अजिंठ्यातील चार पालकांनी गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही.यामुळे या शाळेवर अधिकाऱ्यांची विशेष मेहेरनजर दिसून येत आहे.मात्र हा निंदनीय प्रकार पालकांच्या मुळावर उठला आहे.मुलांना शाळेतून काढणाऱ्या पूर्ण फी दिलेल्या पालकांनाही टी.सी. काढण्यासाठी अवाजवी 500 रु ची मागणी करण्यात येत आहे. यामुळे सदर शाळेवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.कोरोना काळात 1 ली ते 10 वी पर्यंत शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कुणावर हा मुख्य प्रश्न आहे.पालकांकडून शपथपत्र घेऊन यात पळवाटा शोधल्या जात आहे.सदर शाळेच्या अनेक तक्रारी असतांना शिक्षण विभागाची “हातावर घडी, तोंडावर बोट” हा गावात चर्चेचा विषय ठरला आहे.सदर शाळेने 8 वर्षात एकाही पालकाला फी पावती दिलेली नाही.तर आर.टी. ई. च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर वेगळी फिज व प्रत्यक्षात चार पट फी वसुलण्यात येत आहे.या बाबत तक्रारी करणाऱ्या पालकांच्या शाळेची मुख्याध्यापिका अजिंठा पोलीस स्टेशन मध्ये खोट्या तक्रारी देत आहे.त्यामुळे दाद मागावी तर कुणाकडे हा प्रश्न पालकासमोर उभा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here