
मुंबई – सिडकोच्या दुर्लक्षामुळे खारघर विभागातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. प्रभाग क्रमांक पाच मधील सेक्टर बारा, तीन-चार मध्येही रस्त्याची दुरवस्था झालेली होती. लीना गरड नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर, त्यांनी स्वखर्चाने सेक्टर 3, 4, 5, 6, 7 आणि 12 यामध्ये सर्वे करून, सदरचा सर्वे सिडकोला सादर केला होता. रस्त्याचे नूतनीकरण व्हावे यासाठी इतरही बऱ्याच सामाजिक संघटना व नेत्यांनी पाठपुरावा केला होता. त्याचप्रमाणे लीना गरड मॅडम यांनीही पाठपुरावा केल्यानंतर, सेक्टर 12 मधील रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सिडकोकडून मंजूर झाले.
सेक्टर 12 मधील अंतर्गत रस्त्याचे काम मागील दीड वर्षापूर्वी चालू झाले होते. बऱ्यापैकी रस्ते पूर्णही झालेले आहेत. परंतु सेक्टर बारा मधील एफ लाईन मधील काम लांबले होते, कारण या रस्त्याचे काम 2015 साली खारघर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचांनी एकदम निकृष्ट दर्जाचे केलेले होते. तसेच सोसायटीमधील अंतर्गत रस्त्याच्या पेक्षा जास्त उंचीचा, कॉंक्रिटचा रस्ता बनवलेला होता.सदरचे काम एकदम खराब असल्यामुळे, नागरिकांना गेले 3-4 वर्षे मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते.सदरच्या काँक्रीट रस्त्यावर, डांबरीकरणाचे काम कशा प्रकारे करावे याबाबत, सिडकोचे अधिकारी, तसेच कंत्राटदार यांच्याबरोबर वारंवार चर्चा चालू होती. सदरच्या डांबरीकरणाच्या रस्त्याचे काम तीन दिवसापूर्वी चालू झाले असताना, नागरिक आणि सौ लीना गरड मॅडम यांनी सिडको कंत्राटदारांनी चालू केलेले डांबरीकरणाचे काम तात्काळ थांबविले, कारण सेक्टर 12 मधील F लाइन मध्ये गेली पाच वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे.
मुळातच खारघरला 10 एमएलडी पाणी कमी मिळत असल्यामुळे आणि F लाइन ची पाण्याची पाईपलाईन अत्यंत खराब झालेली असल्यामुळे, F लाईन मध्ये पाण्याचा त्रास गेल्या 5 वर्षापासून चालू आहे.
त्यामुळे नागरिकांनी व सौ लीना गरड मॅडम यांनी रस्त्याचे काम थांबविले. एवढ्यावरच न थांबता सौ लीना गरड मॅडम , यांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास सिडकोचे मुख्य पाणीपुरवठा अधिकारी, कार्यकारी अभियंता श्री दलाल साहेब, खारघर शहराचे कार्यकारी अभियंता श्री पुडाळे साहेब व सहाय्यक अभियंता श्री सागर साहेब आणि नवीन डांबरीकरण रस्त्याचे कंत्राटदार यांची एकत्रित मीटिंग सेक्टर 12 , F लाईन मध्ये आयोजित केली होती. सदर ठिकाणी नगरसेविका लीना गरड व अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये सकारात्मक निर्णय झाला व पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता दलाल साहेब यांनी पाणीपुरवठ्याची नवीन पाईप लाईन येत्या 30 दिवसात टाकण्याचे मान्य केले. तसेच खारघरचे श्री पुडाळे साहेब यांनी पाईप लाईनचे काम चालू असताना, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या गटाराच्या ( STORM WATER DRAINAGE ) दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे मान्य केले. त्यानंतरच रस्त्याचे काम करावे असे ठरले.नगरसेविका लीना गरड यांच्यामुळे सेक्टर 12 मधील F लाईन मध्ये नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन व खराब रस्त्याच्या ऐवजी, नवीन चांगला रस्ता, असा चांगला निर्णय झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
