सावखेडा सह परिसरात पुर्णा-चारणा नदी पाञातुन दिवस-राञ होतो,शेकडो ब्रास अवैध वाळु उपसा

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील सावखेडा सह परिसरात पुर्णा-चारणा नदी पाञातुन दिवस-राञ होतो,शेकडो ब्रास अवैध वाळु उपसा,सबंधीताचे अर्थपुर्ण दुर्लक्ष,तरी वरिष्ठ संबंधीत विभागाने अशा अवैध वाळुचा उपसा करणारावर योग्य कारर्वाही करावी अशी मागणी गावक-यांतुन होत आहे, सावखेडासह परिसरातील कोटनांद्रा,देऊळगाव बाजार,म्हसलाफाटा,आडगांवफाटा,दिडगांव,खेडी,इत्यादी ठिकाणी अनेक दिवसापासुन पुर्णा व चारणासह अनेकलहान मोठ्या नदीपाञातुन दिवस-राञ करत शेकडो ब्रासचा अवैध वाळु उपसा होत असतो,व यांना तेवढीच तोलामोलाची साथ सबंधीत पोलीस-महसुल कर्मचारी देतात असे अजब धंदे सावखेडा व परिसरात संबधीताच्या आर्शिवादाने जोरात चालु आहे,व अर्थपुर्ण सबंध प्रस्थापित करण्यासाठी संबधीत विभागाचे कर्मचारी/दलाल सध्या सावखेडा व परिसरात दिवस-राञ तळ ठोकुन परिसरात अवैध वाळु उपसा करणा-या ट्रँक्टर वाल्याचा शोध घेऊन त्यांच्या सोबत अर्थिकबोली बोलताना दिसतात व यांची चर्चा सावखेडा व परिसरात जोरदार ऐकायला मिळत आहे,तसेच या वर्षी परिसरात चांगला पाऊस झाला असल्यामुळे सर्व नद्याना अजुनपर्यत पाणी आसल्याने काही ठिकाणी नदीचे पाणी कमी झाले की लगेचच अवैध वाळुवाहतुक करणारे दिवस-राञ करुन त्याठिकाणची वाळुची वाहतुक करतात. व पुर्णा-चारणा नदीपाञात जवळपास चार ते पाच गावाच्या सार्वजनिक पाणी पुरवठा करणा-या विहीरी आहे,व भविष्यात अशा मोठ्या अवैध वाळु उपशामुळे वरिल परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते, ही टंचाई निर्माण होऊ नाही म्हणुन वरिष्ठ पातळीवरुन अवैध वाळु उपसा करणारावर व त्यांना अशी अवैध वाळु वाहतुकिस परावृत्त करणा-यां महसुल किवा पोलीस कर्मचा-यांवर कठोर कार्यवाही करावी,व हा अवैध वाळु उपसा पुर्ण बंद राहवा यासाठी वरिष्ठपातळीवर महसुल व पोलीस प्रशासन या दोन्ही विभागाकडुन समितीची नेमणुक करावी, व आज रोजी या सर्व नदीपाञातील अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्याचे मोजमाप करुन घ्यावे, कारण की महसुल व पोलीस प्रशासन या दोन्ही विभागाने मोजमाप केल्यामुळे कोणी वाळुचा अवैध उपसा करणार नाही, व या अवैध वाळु उपसा न झाल्यामुळे भविष्यात काहीप्रमाणात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, परिसरात अशा अवैध वाळुचा उपसा करणा-यांना अभय देणा-या पोलीस/महसुल कर्मचा-यांवर व त्यांनी नेमलेल्या दलालावर व अवैध वाळु उपसा करणारावर कडक दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी शेतकरी व गावक-यांतुन होत आहे..
पूर्णा नदी मधील वाळू उपसा तत्काळ थांबवा यासाठी वारंवार महसूल विभाग व पोलीस स्टेशनची संपर्क साधून नाही वाळू उपसा थांबलं नाही त्यात वाळू उपसा न थांबल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा येणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष योगेश तेजराव गोंगे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here