मनमाड : केंद्रियराज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवलेसाहेब व सौ.सिमाताई आठवले लवकरात लवकर कोरोना मुक्त होउन त्यांची प्रकृती चांगली होण्यासाठी दावल मलिक बाबा (आंतापुर) मनमाड दर्गा वर चादर चढवुन दुवा करण्यात आली, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष – मा.वंदेशजी गांगुर्डे यांनी मनमाड दि. 2 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना झालेली कोरोनाची बाधा दूर व्हावी आणि त्यांची प्रकृती चांगली म्हणुण ना.आठवले साहेबांना दवा सोबत दुवा पण गरजेचे आहे. म्हणुणच सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी रिपाइं(आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या वतीने दावल मलिक बाबा मनमाड दर्गा वर चादर चढवुन दुवा करण्याचे आयोजन यांनी केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लगेच मुंबईत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोबत त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांना ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ना.रामदास आठवले हे कोरोनातून लवकर बरे व्हावेत ना. रामदासजी आठवले हे मूळपासुनच पँथरसारखे आक्रमक आहेत ते कोरोना ला हरवून विजयी विरासारखे पुन्हा जनसेवेत रुजू होतील.असा विश्वास उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांनी व्यक्त केला.या प्रसंगी परवेजभाई शेख,महम्मदभाई शेख,रिपब्लिकन पार्टि एमप्लाॅइज फेडरेशन अध्यक्ष मटरुभाई चुनियान युवा नेते दिपकजी साळवे,पंचमजी ठाकुर बाळु पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते,
Home Breaking News केंद्रियराज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवलेसाहेब व सौ.सिमाताई आठवले लवकरात लवकर कोरोना मुक्त होउन त्यांची...