सिल्लोड शहरातील जिल्हा परिषद शाळेची प्रचंड दुरवस्था

0

सिल्लोड ( प्रतिनिधी:-विनोद हिंगमीरे) सिल्लोड शहरातील जिल्हा परिषद शाळेची प्रचंड दुरवस्था झाली असून या शाळेच्या बहुतेक खोल्या मोडकळीस आल्या असून या खोल्यांचा व मोकळ्या परिसराचा वापर अनधिकृत कामांसाठी होत असल्याने याकडे तात्काळ वरिष्ठ पातळीवरून लक्ष द्यावे अशी मागणी सिल्लोड शहरातील सुजाण नागरिकांनी केली आहे
मागील काही वर्षांपासून औरंगाबाद जिल्हा परिषद च्या माध्यमातून अनेक ठिकाणच्या मोडकळीस आलेल्या शाळांच्या जुन्या इमारती जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्यात येत आहेत परंतु यास सिल्लोड शहरातील जिल्हा परिषद शाळेची इमारत अपवाद असल्याचे दिसून येते मागील तीस ते चाळीस वर्षांपासून असलेली सिल्लोड शहरातील जिल्हा परिषद शाळेची इमारत मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेली आहे या इमारतीतील अनेक वर्गांचे दरवाजे पूर्णपणे तुटलेले असल्यामुळे या खोल्यांचा रात्रीच्या वेळी गैर कामांसाठी वापर होत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे याठिकाणी जिल्हा परिषदेने कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे गरजेचे आहे इमारतीच्या बाजूने संरक्षण भिंत बनवावी व जिल्हा परिषदेच्या करोडो रुपये किमतीच्या जागेचे संवर्धन करावे अशी मागणी पालकांमधून केला जात आहे या जिल्हा परिषद शाळे मधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत तर काहींनी राजकारणात गरुड भरारी घेतलेली आहे त्यातलेच एक राज्याचे महसूल राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात गोरगरिबांच्या मुलांना योग्य आणि मोफत शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळा टिकणे गरजेचे आहे म्हणून या शाळेचे पुनर्वसन करून योग्य प्रकारे संवर्धन व्हावे अशी माफक अपेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here