
सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे ) केळगाव:-सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरात या वर्षी शेतक-यांनी शेतात मोठ्या प्रमाणावर झेंडु रोपे लागवड केली होती.या रोपाचे रुपांतर आता झेंडु फुलात झाल्यानंतर झेंडुची शेती चांगलीच बहरली असुन पिवळे, केसरी या दोन जातीचे फुले दुरुनच मनमोहत आहे.जसे दोन्ही फुलाच्या रंगामध्ये फरक आहे तसेच फुलाची
विक्री करतांना भावात ही फरक आहे.यामुळे परिसरात झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे दिवाळी दसर्यापर्यत झेंडु पुर्णपणे तयार होणार असल्याचे शेतकर्यांकडून सागण्यात आले आहे,यंदा परिसरात सततच्या पावसाने कापुस,मका,मुग,उडीद सोयाबीन आदी पिके विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पुर्णपणे ग्रस्त झाली आहे मात्र परिसरात शेतकर्यांनी लागवड केलेले झेंडू फुलांची शेती चांगल्या प्रकारे बहरली असल्याने येत्या २५ ऑक्टोबर दसरा व १४ नोव्हेंबरला दिवाळी असुन या सणात झेंडु फुलाचे वेगळेच महत्व आहे.या दोन्ही सणाच्या एक एक दिवस अगोदर फुले तोडुन रात्रीच वाहनाने जळगांव,औरंगाबाद,जालना व ईतर बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जावे लागते.यावर्षी झेंडुची फुलाला चांगला भाव मिळण्याचा अंदाज शेतकरीवर्गातुन वर्तविण्यात येत आहेत.सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे झेंडूची शेती बहरली आहे दसरा सणानिर्मित झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी असल्याने शेतकर्यांनी झेंडूची शेती दिसत आहे
