लायन्स इंटरनॅशनल तर्फे जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी पीस पोस्टर स्पर्धा

0

मनमाड : जागतिक स्तरावर शांतता निर्माण व्हावी हा दृष्टिकोन  ठेवून विद्यार्थ्यांवर बालवयातच संस्कार व्हावेत यासाठी लायन्स इंटरनॅशनल तर्फे जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी पीस पोस्टर स्पर्धा घेतली जाते. सहभागी विद्यार्थ्यांना जागतिक शांतते बद्दलची आपली कल्पना चित्राद्वारे  मांडायची असते.ह्या वर्षी “सर्वीस थृ पीस” ह्या संकल्पनेवर चित्र काढायची होती. शहरातील गौरी ताथेड या विद्यार्थिनीने काढलेल्या चित्राची  नाशिक, नगर, व पुणे या जिल्ह्यातून निवडलेल्या सर्वोत्तम दहा चित्रात निवड झाली आहे, लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइडने शहर पातळीवर पीस पोस्टर स्पर्धा घेतली होती.ह्या स्पर्धेत शहरातिल 45 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. यातील निवडलेल्या दोन  चित्रांना वरिष्ठ पातळीवरील स्पर्धेकरिता पाठविण्यात आले. या स्पर्धेत नाशिक नगर व पुणे जिल्ह्यातून 4500 स्पर्धकानी सहभाग नोदवला होता पैकी 130 चित्रांची अंतीम फेरीसाठी निवड झाली त्यातिल एक चित्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता पाठविण्यात आले.ह्याचे परिक्षण अभिनव कला महाविद्यालयाचे प्रा.फडके, प्रा.चव्हाण ह्यानी केले.स्पर्धेचे संयोजन सीमा दाबके ह्यानी केले. ऑनलाईन कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान प्रांतापाल अभय शास्त्री,व आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी हे करणार आहेत,     ह्या यशा बद्दल गौरी चे गुडशेफर्ड हायस्कूलचे मुख्याध्यापक ,शिक्षकानी आभिनंदन केले आहे.शहर पातळीवर स्पर्धेचे आयोजन लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राईडचे अध्यक्ष डॉ.शैलेश भंडारी,सचिव डॉ.मोहित लोढा,खजिनदार श्रेणीक बरडिया,डॉ.अजय भंसाळी, मांगलेश बाकलिवाल ह्यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here