माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिना निमित्त वाचक प्रेरणा दिनाचा कार्यक्रम आयोजित

0

मनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिना निमित्त वाचक प्रेरणा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मोहिनी माणके, ह्या उपस्थीत होत्या.स्व.सुरेश माणके,व स्व.मनिष माणके ह्यांच्या स्मृति प्रित्यार्थ 40000 रु.ग्रंथ सम्पदा वाचनालयास भेट म्हणून दिली. मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी, नरेश गुजराथी, प्रज्ञेश खांदाट आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,  मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे माजी सचिव स्व.किशोर नावरकर यांचे निधन झाले. त्यांना वाचनालयातर्फे सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. अतिथींच्या हस्ते ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे माजी सभासद व 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मनमाडचे सांस्कृतिक वैभव असणार्‍या श्री दत्तोपासक मंडळाचे अध्यक्ष स्व.सुरेश माणके व स्व.मनिष सुरेश माणके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि वाचक प्रेरणा दिनानिमित्त मोहिनी मनिष माणके यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास 40 हजार रुपये किंमतीची 364 पुस्तके भेट दिली. यात आध्यात्मिक, ऐतिहासिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य, व्यापार, योगशास्त्र ,वास्तुशास्त्र, ज्योतिष्य, पौराणिक, धर्मशास्त्र, कादंबर्‍या, प्रवासवर्णन, कला, संगीत अशा विविध विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे. वाचनालयातर्फे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांनी संचालक मंडळातर्फे ही भेट स्विकारली.

मनमाड शहरातील समृध्द वाचन परंपरेला बळ मिळावे आणि जिज्ञासू वाचकांची भुख भागावी म्हणून वाचक प्रेरणा दिनाचे औचित्य साधून स्व.सुरेश माणके व स्व.मनिष माणके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही ग्रंथसंपदा वाचनालयास दिली आहे. असे  मोहिनी माणके यांनी याप्रसंगी सांगितले.  नरेश गुजराथी यांनी वाचनालयातर्फे माणके कुटूंबियांचे ऋण व आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास अक्षय सानप, राहूल लांबोळे, ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी आदी मान्यवरांसह वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here