मालेगाव येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

मालेगाव –  धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सकाळी प. पूज्य विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ मालेगाव येथील सामाजिक व धम्म कार्यकर्ते उपस्थित होते.प्रथम धम्म ध्वज व निळ्या रंगाच्या ध्वजाचे आरोहन करण्यात आले.नालंदा बुद्ध विहार समिती चंदन पुरी शिवार चे सरचिटणीस मधुकर केदारे सर व सामाजिक कार्यकर्ते या.दादाजी महाले, रमेश खरे, जयवंत निकम,रवि निकम,आदीनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि पंचाग प्रणाम,त्र्रीशरण, पंचशील ग्रहण केले.सायं ५.३० वाजता नालंदा बुद्ध विहार येथे सोशल डिस्ट सिंग चार वापर करून पूजा विधी व प्रवचन व धम्म चर्चा झाली व खीरदान कार्यक्रम संपन्न झाला. बाबासाहेब यांनी दिलेल्या धम्माचे आचरण व अनुपालन करणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येकाने विहार विकास कामी आपले वैयक्तिक जीवनासारखे सामाजिक योगदान देण्यासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा ठेवतो असे मत व्यक्त केले.या प्रसंगी नालंदा चे अध्यक्ष संजय वाघ,ट्रस्टी नारायण जगताप , गौतम पटाईत, उपासक कमल काॅम्प्युटरचे अहिरे सर,डांगळे सर,मंगेश निकम इतर लहान उपासक कार्यक्रमास उपस्थित होते.प्रत्येक धम्म उपासकाने दर रविवारी विहारात ध्यान करण्यासाठी आले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी उपासक सतीश गांगुर्डे हे सुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here