
सिल्लोड ( प्रतिनिधी – विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील भराडी ते अंभई या मुख्य रस्त्यावरील अंभई गावाजवळील केळणा नदीवरील पुलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहेत. संबंधित प्रशासन मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे अंभई ते भराडी हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. मात्र या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने लोखंडी सळ्या व तार हे उघडे पडले आहेत त्यामुळे केव्हा अपघात होईल हे सांगता येत नाही. व पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाऊस झाला कि या पुलाची उंची कमी असल्यामुळे पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. आणि या पुलावरून मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे पाण्यामधून खड्डे दिसत नाहीत त्यामुळे गाडी केव्हा खड्ड्यात जाईल.व अपघात होईल हे सांगता येत नाही व असे छोटे मोठे अपघात या पुलावर झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे भराडी व अंभई हे दोन्ही मुख्य बाजारपेठेचे गाव असून या गावांमध्ये बॅक शाळा व इतर काही सोसायट्या पतसंस्था आहेत. त्यामुळे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.आणि या अशा रस्त्याने प्रवास करणे ही मोठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.अनेक वेळा वृत्तपत्र तसेच टीव्ही चॅनलच्या माध्यमातून या पुलाचा संबंधीच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. मात्र प्रशासन हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे की काय असा प्रश्न वाहनधारकांना व नागरिकांना पडला आहे.
