
सिल्लोड ( प्रतिनिधि :-विनोद हिंगमिरे ) सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते शेख इस्माइल शेख सलीम यांची ऑल इंडिया उलमा बोर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनच्या युवा प्रदेश अध्यक्ष म्हणुन नुकतीच निवड करण्यात आली, ऑल इंडिया उलमा बोर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सय्यद तारिक अन्वर यांच्या आदेशाने व हस्ते सिल्लोड येथील सर्व समाजाच्या गोरगरिबांना लागेल तेव्हा मदत करणारे व नेहमी त्याच्या सुख-दु:खात सहभागी होणारे सामाजिक कार्यकर्ते शेख इस्माइल शेख सलीम यांची ऑल इंडिया उलमा बोर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनच्या युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली,
यावेळी लोकसत्ता युवा संघटना मराठवाडा उपाध्याक्ष शेख कलीम,मराठवाडा कार्याध्यक्ष अब्दुल रहेमान मराठवाड़ा विधि सल्लागार शेख उस्मान शेख ताहेर मराठवाडा सचिव आसिफ अब्रार खान आम आदमी पक्षाचे महेश शंकरलाल शंकरपेल्ली पत्रकार शेख मुस्ताक शेख इसाक तालुका अध्यक्ष विशाल चव्हाण, तालुका उपाध्याक्ष शकील शेख,ता.सचिव याकुब कुरैशी,अंजिठा सर्कल प्रमुख शेख सर्फराज यांनी त्यांच्या या निवडीबद्दल व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तसेच त्यांच्यावर सर्व स्तरातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. .
